एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिकमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरी जीएसटीचा छापा, दोन पेट्या भरून कोट्यवधींच्या कोऱ्या करकरीत नोटा सापडल्या

Nashik Crime : नाशिक शहरात जीएसटी गुप्तचर विभागाने कारवाई करत एक मोठं घबाड उघडकीस आणलं आहे

Nashik Crime : शनिवारी जीएसटी (GST) विभागाच्या पुणे येथील गुप्तचर यंत्रणेने नाशिक (Nashik) शहरातील देवळाली (Deolali) परिसरात मोठी कारवाई केली होती. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या (Software Engineer) घरावर छापा टाकून त्याच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात येत होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. (Nashik Crime News)

नाशिक शहरात जीएसटी गुप्तचर विभागाने मोठी कारवाई करत एक मोठं घबाड उघडकीस आणलं आहे. सॉफ्टवेअर अभियंताच्या घरी करण्यात आलेल्या छापेमारीत जीएसटी गुप्तचर खात्याने कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान एका रिव्हॉल्व्हरचीही जप्ती करण्यात आली आहे.

कोट्यवधी रुपयांची रोकड सापडली

ही धाड श्रीकांत परे नावाच्या तरुणाच्या घरी टाकण्यात आली होती. तो सॉफ्टवेअर इंजिनीअर असून, ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप तयार करून विक्री करायचा. या व्यवसायातून त्याने शासनाची मोठ्या प्रमाणात करचूक केल्याचा संशय जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना होता. या संशयाच्या आधारे जीएसटीच्या गुप्तचर पथकाने छापा टाकला असता, दोन पेट्यांमध्ये भरलेली कोट्यवधी रुपयांची रोकड आढळून आली आहे. या कारवाईनंतर श्रीकांत परे या संशयित तरुणाला पुण्याला नेण्यात आले असून, तिथे जीएसटी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पुढील चौकशी केली जात आहे. जीएसटी विभागाने केलेल्या या कारवाईत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Nashik Crime : येवला पोलिसांची मोठी कारवाई, गावठी कट्टे बाळगणाऱ्यांना अटक  

येवला तालुका पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एक गावठी कट्टा व तीन काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना जेरबंद केले आहे. याबाबत येवला तालुका पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू व उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. येवला तालुक्याच्या हद्दीमध्ये चोरी व घरफोडीचे प्रमाण वाढल्याने त्याला प्रतिबंध करण्याकरिता पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, सचिन वैरागर, सागर बनकर, पंकज शिंदे, दीपक जगताप, चालक राजू डुबे हे खासगी वाहनाने पाटोदा परिसरात पेट्रेलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ऋषिकेश मोतीराम माळी (क्य २४, रा. आंबेगाव, ता. येवला), सोपान निवृत्ती जगताप (वय ३२, रा. मरळगोई, ता. निफाड) हे गावठी कट्टा बाळगून असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने येवला तालुका पोलीस ठाणे व लासलगाव पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी कट्टा, तीन काडतुसे व एक मोबाइल जप्त करण्यात आले आहे. 

आणखी वाचा 

Pune Crime Rave Party: मोठी बातमी: पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयासोबत बडा क्रिकेट बुकी सापडला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
Embed widget