एक्स्प्लोर

Rahul Gandhi Manipur Violence: पंतप्रधान मोदी हे ‘रोमच्या निरो’ पेक्षाही असंवेदनशील; मणिपूर हिंसाचारावरून काँग्रेसचे टीकास्त्र

Manipur Violence: पंतप्रधान मोदी हे रोमच्या निरोपेक्षाही असंवेदनशील असल्याचे टीकस्त्र काँग्रेसने सोडले आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

Manipur Violence:  ‘रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता’ या प्रवृत्तीलाही लाजवेल एवढा असंवेदनशील पंतप्रधान भारताला लाभला असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाचार 52 दिवसानंतरही शमलेला नाही आणि पंतप्रधानही या हिंसाचारावर साधा ‘म’ सुद्धा काढत नाहीत हे या देशाचे व मणिपूरी जनतेचे दुर्दैवी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. केंद्र सरकार स्वतः काही करत नाही आणि विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी मणिपूरच्या जनतेची विचारपूस करण्यास जात असताना त्यांना रोखले जाणे हे मोदींच्या हुकुमशाही कारभाराचा नमुना आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.  

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, राहुल गांधी यांना मणिपूरमध्ये रोखल्याबद्दल भाजपा सरकारचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. मणिपूरची जनता केंद्र सरकारच्या मदतीची आस लावून बसली आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मणिपूरला जळत ठेवून अमेरिकेच्या दौऱ्यावर चमकोगिरी करत असल्याची सडकून टीका पटोले यांनी केली. 

काँग्रेस नेते राहुल गांधी हे हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या लोकांचे दुःख जाणून घेण्यासाठी गेले होते. राहुल गांधी यांना रस्ते मार्गाने जाण्यास सुरुवातीला परवानगी दिली. मणिपूरची जनता हजारोंच्या संख्येने राहुल गांधींचे स्वागत करण्यास उभी होती. राहुल गांधी यांची लोकप्रियता पाहून भाजपा सरकार घाबरले आणि त्यांचा ताफा अडवून त्यांना परत पाठवले असल्याचा आरोप पटोले यांनी केला. 

राहुल गांधींना परत पाठवून स्थानिक लोकांवर पोलीसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.  मणिपुरी जनता मोठ्या संख्येने राहुल गांधींना भेटण्यासाठी आलेली होती. पण भाजप सरकारने त्यांना लोकांना भेटू दिले नाही. मोदी सरकार राहुल गांधी यांना घाबरले आहे हे पुन्हा स्पष्ट झाले. राहुल गांधी प्रेम, बंधुभाव आणि शांततेचा संदेश घेऊन मणिपूर येथे पोहचले होते पण मोदी सरकारला मणिपूर शांत व्हावे असे वाटत नसावे म्हणूनच राहुल गांधींना रोखण्यात आले असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

मणिपूरच्या आजच्या परिस्थितीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले. पोलीस स्टेशनवर हल्ले होऊन शस्त्रास्त्र पळवली जात आहेत. प्रार्थना स्थळे जाळली जात आहेत. जीवित व वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली आहे पण मनमानी, लहरी स्वभावाचे केंद्र सरकार मात्र मणिपूरला अग्निकांडात होरपळत सोडून भाषणबाजी, इव्हेंटबाजी व जाहिरातबाजीत मग्न आहे. मणिपूरच्या लोकांना राहुल गांधींना भेटू न देण्याच्या भाजपा सरकारल्या भूमिकेला केवळ मणिपूरच नाही तर देशातील जनताही माफ करणार नाही, असेही पटोले यांनी म्हटले.

राहुल गांधींचा ताफा रोखला 

राहुल गांधी यांना इम्फाळ (Imphal) विमानतळासमोरील बिष्णुपूर चेकपोस्टवर थांबवण्यात आलं.  इम्फाळपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या विष्णुपूर जिल्ह्यात राहुल गांधी यांचा ताफा थांबवण्यात आला आहे. परिसरातील हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखलं असल्याची माहिती देण्यात आली. 

दोन दिवसांचा मणिपूर दौरा 

राहुल गांधी दोन दिवसीय मणिपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करतील. शिवाय या दौऱ्यात राहुल गांधी मदत शिबिरांनाही भेट देणार आहेत. यासोबतच त्यांचा इम्फाळ आणि चुरचंदपूर इथल्या नागरी समाजाच्या प्रतिनिधींना भेटण्याचा कार्यक्रम आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Bomb Threat: 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसले, 400 किलो RDX आणि 1 कोटी लोकांच्या मृत्यूचा दावा; मुंबईला 26/11 हून मोठ्या हल्ल्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर
14 पाकिस्तानी दहशतवादी घुसले, 400 किलो RDX आणि 1 कोटी लोकांच्या मृत्यूचा दावा; मुंबईला 26/11 हून मोठ्या हल्ल्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर
Video: नवी मुंबईत रस्त्यात खड्डा अन् आयुष्य बर्बाद; तरुण दुचाकीवरून उडून भरधाव कारखाली चिरडणारच होता, पण..
Video: नवी मुंबईत रस्त्यात खड्डा अन् आयुष्य बर्बाद; तरुण दुचाकीवरून उडून भरधाव कारखाली चिरडणारच होता, पण..
भारताशेजारील देशाचं मोठं पाऊल, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X वर बंदी; नेमकं कारण काय?
भारताशेजारील देशाचं मोठं पाऊल, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X वर बंदी; नेमकं कारण काय?
Sanjay Raut on Amit Shah: काय उखडायची ती उखडा, उद्धव आणि राज यांच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणसाचाच भगवा फडकेल, संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल
काय उखडायची ती उखडा, उद्धव आणि राज यांच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणसाचाच भगवा फडकेल, संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Threat Women Officer : अॅक्शन घेईन,कायद्याने वागणाऱ्या महिला अधिकाऱ्याला अजितदादांची धमकी
Chhagan Bhujbal Home Security :छनग भुजबळांच्या आक्रमक भूमिकेनंतर निवासस्थानी पोलीस बंदोबस्त
City Sixty Superfast news : सिटी सिक्स्टी वेगवान बातम्या : 04 Sep 2025 : ABP Majha
Vishwajit Kadam On Congress : आज ना उदया काँग्रेस सत्तेत येईल, विश्वजीत कदमांनी शड्डू ठोकला
Maratha Reservation GR : जीआर बदलण्याचा विनाकरण बदलण्याचा संभ्रम निर्माण करत आहेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Bomb Threat: 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसले, 400 किलो RDX आणि 1 कोटी लोकांच्या मृत्यूचा दावा; मुंबईला 26/11 हून मोठ्या हल्ल्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर
14 पाकिस्तानी दहशतवादी घुसले, 400 किलो RDX आणि 1 कोटी लोकांच्या मृत्यूचा दावा; मुंबईला 26/11 हून मोठ्या हल्ल्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर
Video: नवी मुंबईत रस्त्यात खड्डा अन् आयुष्य बर्बाद; तरुण दुचाकीवरून उडून भरधाव कारखाली चिरडणारच होता, पण..
Video: नवी मुंबईत रस्त्यात खड्डा अन् आयुष्य बर्बाद; तरुण दुचाकीवरून उडून भरधाव कारखाली चिरडणारच होता, पण..
भारताशेजारील देशाचं मोठं पाऊल, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X वर बंदी; नेमकं कारण काय?
भारताशेजारील देशाचं मोठं पाऊल, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X वर बंदी; नेमकं कारण काय?
Sanjay Raut on Amit Shah: काय उखडायची ती उखडा, उद्धव आणि राज यांच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणसाचाच भगवा फडकेल, संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल
काय उखडायची ती उखडा, उद्धव आणि राज यांच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणसाचाच भगवा फडकेल, संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल
मोदींच्या आईवरून शिवीगाळ म्हणून बिहार बंद, पण त्याच बंदविरोधात रस्त्यांवर शिव्यांचा महापूर, भाजप महिला मोर्चाच्या नेत्यांनी 'मैं भी मां हूं' साडीचे दुकान लुटलं
मोदींच्या आईवरून शिवीगाळ म्हणून बिहार बंद, पण त्याच बंदविरोधात रस्त्यांवर शिव्यांचा महापूर, भाजप महिला मोर्चाच्या नेत्यांनी 'मैं भी मां हूं' साडीचे दुकान लुटलं
Shikhar Dhawan: 'आता गब्बरचं काय होणार?', ईडीने आता शिखर धवनला घेरलं, ऑफिसमध्ये बोलवत तब्बल 8 तास प्रश्नांची सरबत्ती, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'आता गब्बरचं काय होणार?', ईडीने आता शिखर धवनला घेरलं, ऑफिसमध्ये बोलवत तब्बल 8 तास प्रश्नांची सरबत्ती, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
मोठी बातमी! अनुकंपा तत्वावरील 10 हजार जागा भरल्या जाणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! अनुकंपा तत्वावरील 10 हजार जागा भरल्या जाणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
Mumbai Accident News : लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बेस्ट बसने दोन तरुणांना चिरडलं, एकाचा मृत्यू, एक गंभीर
लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बेस्ट बसने दोन तरुणांना चिरडलं, एकाचा मृत्यू, एक गंभीर
Embed widget