Ajit Pawar Threat Women Officer : अॅक्शन घेईन,कायद्याने वागणाऱ्या महिला अधिकाऱ्याला अजितदादांची धमकी
Ajit Pawar Threat Women Officer : अॅक्शन घेईन,कायद्याने वागणाऱ्या महिला अधिकाऱ्याला अजितदादांची धमकी
करमाळा: करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही.
त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ काॅलच केला. व्हिडीओ काॅल येताच अंजली कृष्णा बांधावरच बसल्या. माढ्याच्या कुर्डू गावात कारवाईसाठी अंजली कृष्णा आल्या असताना हा संपूर्ण प्रकार घडला आहे. अजित पवाराचा आणि अंजली कृष्णा यांचा व्हिडीओ काॅल व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो...मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना.. असे रागावून अजित पवार बोलले ... आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला.




















