Video: नवी मुंबईत रस्त्यात खड्डा अन् आयुष्य बर्बाद; तरुण दुचाकीवरून उडून भरधाव कारखाली चिरडणारच होता, पण..
A biker fell after hitting a pothole: सुदैवाने, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला नाही, परंतु या घटनेने पुन्हा एकदा खराब रस्त्यांवर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

A biker fell after hitting a pothole: महाराष्ट्रात चांदा ते बांदा रस्त्यांची पूरती वाताहत झाली असून अनेक महाकाय खड्ड्यांनी नागरिकांची ससेहोलपट सुरु आहे. केलेले रस्तेही अवघ्या काही दिवसात उखडत असल्याने रस्ते करणाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही? असाही सवाल होत आहे. खड्ड्यातून जीवघेणा प्रवास सुरुच असताना आता नवी मुंबईत भयावह व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.जेएनपीटी महामार्गावर खोल खड्ड्यामुळे एक दुचाकीस्वार रस्त्यात कोसळला. हा अपघात इतका अचानक झाला की आजूबाजूचे लोकही घाबरले. सुदैवाने, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला नाही, परंतु या घटनेने पुन्हा एकदा खराब रस्त्यांवर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
A biker fell after hitting a pothole on JNPT highway in Navi Mumbai.
— Deadly Kalesh (@Deadlykalesh) September 3, 2025
pic.twitter.com/9gWPWEJNXF
खड्ड्यात गेल्याने अपघात झाला
प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा तरुण त्याच्या दुचाकीवरून सामान्य वेगाने जात होता. महामार्गावरून जात असतानाच दुचाकीचे चाक समोरील खड्ड्यात अडकले. दुचाकीचा तोल गेला आणि तो रस्त्यावर कोसळला. यावेळी इतर जाणाऱ्यांनी त्याला मदत केली आणि त्याला सुरक्षित ठिकाणी नेले. जेएनपीटी महामार्गावर अनेक ठिकाणी खोल खड्डे असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. पावसामध्ये परिस्थिती अधिक भयंकर झाली आहे. वाहनचालकांना अनेकदा त्रास होतो आणि अनेक वेळा अपघात होतात. असे असूनही, संबंधित विभागांकडून दुरुस्तीचे काम योग्यरित्या केले जात नाही.
लोकांनी प्रशासनाकडे खड्डे बुजवण्याची मागणी केली
या घटनेनंतर परिसरातील लोकांनी नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, जोपर्यंत प्रशासन हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी गांभीर्याने घेत नाही, तोपर्यंत अपघात होतच राहतील. महामार्गासारख्या वर्दळीच्या रस्त्यावर अशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते, असे लोकांचे म्हणणे आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























