PM Modi Navi Mumbai Visit LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत, दीघा रेल्वे स्थानक ते नवी मुंबई मेट्रो, पंतप्रधान मोदींच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण
PM Modi Navi Mumbai Visit LIVE : : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नाशिक येथे युवा महोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर. ते शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूचं उद्घाटन केले.

Background
Atal Bihari Vajpayee Sewari Nhava Sheva Atal Setu : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नाशिकमधील युवा महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर, ते मुंबईकडे रवाना झाले. त्याआधी त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा केली. पंतप्रधानांच्या हस्ते शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचं उद्घाटन केलं. 12 जानेवारी हा दिवस देशात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.स्वामी विवेकानंद जी यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त आज 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये साजरा केला जात आहे.
माझं भाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला मी आज नाशिकमध्ये आहे. मी सर्वांना युवा दिनाच्या शुभेच्छा देतो. आज राजमाता जिजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो, असं मोदी नाशिकमध्ये म्हणाले.
शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचं उद्घाटन
मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू आज नागरिकांसाठी खुला होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटलबिहारी वाजपेयी सागरी सेतूचं लोकार्पण करण्यात आलं. या मार्गावर एकेरी प्रवासासाठी अडीचशे रुपये टोल आकारण्यात येणार आहे.
PM Modi Speech : जिथे दुसऱ्यांच्या आशा संपतात, तिथून मोदींची गॅरंटी सुरु होते - पंतप्रधान मोदी
PM Modi Speech : आज मोदी गॅरंटी ही देशातल्या घराघरात पोहचली आहे. जिथे दुसऱ्यांच्या आशा संपतात, तिथे मोदींची गॅरंटी सुरु होते, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
PM Modi Speech : त्यामुळे आधीच्या सरकारला देशाचा विकास करता आला नाही, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा
PM Modi Speech : अटल सेतू हा वांद्रे वरळी सी लिंकपेक्षा जास्तपटीने आधुनिक आहे. तेव्हाच्या सरकारला हा सेतू बनवण्यासाठी 10 वर्ष लागली होती. काहीच वर्षात हा अटल सेतू मुंबईकरांच्या सेवेत आलाय. ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून देशावर राज्य केलं, त्यांची नियत चांगील नव्हती. त्यामुळे त्यांना देशात विकास करता आला नाही.






















