एक्स्प्लोर

"आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान"; पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हटल्यानंतर राऊतांचं ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेतील भाषणादरम्यान केलेल्या 'आंदोलनजीवी' वक्तव्यानंतर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच संजय राऊत यांनी ट्वीट करत 'आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे' असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आंदोलनजीवी' वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रियांनी जोर धरला आहे. काँग्रेसच्या वतीने "हा शेतकऱ्यांचा अपमान आहे", अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संयुक्त किसान मोर्चाने आम्हाला आंदोलनजीवी असण्यावर गर्व असल्याचं म्हटलं आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असं म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे की, "होय आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे.. जय जवान जय किसान!" तसेच त्यांनी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्यासोबतचा फोटोही शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी दिल्ली-उत्तरप्रदेश गाझीपूर बॉर्डरवर राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. तसेच संजय राऊत यांनी आणखी एक ट्वीट करत, "गर्वसे कहो...हम सब आंदोलनजीवी हैं. जय जवान. जय किसान!'' असं म्हटलं आहे.

कांग्रेसचं म्हणणं काय?

काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे की, "आंदोलनजीवी शब्दाचा वापर शेतकऱ्यांचा अपमान आहे. तसेच त्यांनी ट्वीट करताना म्हटलं आहे की, "पंतप्रधानांचा 'आंदोलनजीवी' हा शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही. या शब्दातून आंदोलनावर जगणारा असा अर्थ ध्वनीत होतो. हा उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलनाबाबत वापरला गेला. पण शेतकरी हा कोणताही 'जीवी' नाही, तर मानवतेला 'जीवि'त ठेवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांचा असा अवमान करणे निंदनीय आहे."

किसान मोर्चाचा अपमान

संयुक्त किसान मोर्चाने आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, "संयुक्त किसान मोर्चा पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या केलेल्या अपमानाची निंदा करतो. शेतकरी पंतप्रधानांना आठवण करुन देऊ इच्छितात की, ते आंदोलनजीवीच होते, ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. त्यामुळेत आम्हालाही आंदोलनजीवी असण्यावर गर्व आहे. ते भाजप आणि त्यांचे वंशज आहेत, ज्यांनी कधीकाळी इंग्रजांच्या विरोधात आंदोलनं केली नाहीत. ते नेहमी जन आंदोलनांच्या विरोधात होते. त्यामुळेच ते आताही जन आंदोलनांना घाबरत आहेत.

दरम्यान, राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर सादर करण्यात आलेल्या आभार प्रस्तावावर चर्चेवेळी उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी 'आंदोलनजीवी' या शब्दाचा वापर केला होता. पंतप्रधानांनी कृषी कायद्यांवरील सुधारणांवर 'यु-टर्न' घेण्यास काँग्रेसलाही खडे बोल सुनावले. त्यावेळी ते म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून देशात 'आंदोलनजीवी' नावाच्या नव्या प्रजातीने जन्म घेतला आहे. जी आंदोलनाशिवाय जगूच शकत नाही."

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget