एक्स्प्लोर
Advertisement
प्ले ग्रुप आणि इयत्ता पहिली शाळा प्रवेशाच्या वयामध्ये 15 दिवसांच्या शिथिलतेचा निर्णय
राज्यातील पूर्व प्राथमिकच्या वर्गात (इयत्ता पहिली) प्रवेश घेण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत सहा वर्ष पूर्ण असावीत अशी अट ठेवली होती.
मुंबई : प्ले ग्रुप आणि इयत्ता पहिली शाळा प्रवेशाच्या वयामध्ये 15 दिवसांच्या शिथिलतेचा निर्णय सरकारने घेतला आहे. शाळा प्रवेशासाठी शासनाने पहिलीसाठी सहा वर्षे आणि प्लेग्रुप/ नर्सरीसाठी तीन वर्षे पूर्ण असा नियम केलेला आहे. आता यामध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय शासनामार्फत घेतला गेला आहे.
त्याप्रमाणे किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार शाळा मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. मुंबईसह राज्यातील पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशाच्या बाबतीत हे बदल करण्यात आले आहेत.
किमान वयाच्या नियमामध्ये शिथिलता आणण्यासाठी निवेदने शासनाला प्राप्त होत होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील पूर्व प्राथमिकच्या वर्गात (इयत्ता पहिली) प्रवेश घेण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत सहा वर्ष पूर्ण असावीत अशी अट ठेवली होती.
आता यासाठी आणखी 15 दिवसांची सूट देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. मात्र या शिथिलतेसाठीही 30 सप्टेंबर ही तारीख प्रत्येक वर्षासाठी ठरवली असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात येणार आहे.
मात्र, या 30 सप्टेंबर तारखेमुळे आणखीच गोंधळ उडण्याची शक्यता आहे कारण शाळा जून, जुलै महिन्यात सुरु असताना सप्टेंबर महिना शाळा प्रवेशासाठी का गृहीत धरण्यात यावा असा सवाल पालक आणि शिक्षक संघटना उपस्थित करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement