एक्स्प्लोर
पत्नीला नांदायला सोडत नसल्याने तरुणाकडून सासऱ्याची हत्या
पिंपरी-चिंचवड : पत्नीला नांदायला सोडत नाही, या रागातून तरुणाने सासऱ्याची हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे. आरोपी विनोद सुरवसे फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
चिखलीमध्ये राहणाऱ्या विनोद सुरवसेचं पत्नीशी पटत नव्हतं. वारंवार उडणाऱ्या खटक्यांना कंटाळून सहा महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीनं घर सोडलं. बुधवारी विनोद तिला आणायला थेरगावला गेला. मात्र गरड कुटुंबियांनी तिला न पाठवण्याचा निर्णय घेतला.
यावरुन झालेल्या वादात विनोदनं सासरे शंकर गरड यांच्यावर चाकूनं हल्ला केला. यात जखमी झालेल्या गरड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाकड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून विनोदचा शोध सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement