एक्स्प्लोर

Nashik News: काय सांगता! एका रुपयात भात पिकाला 49 हजार रुपयांचं संरक्षण, असा करा पीक विमा अर्ज? 

Nashik : केवळ एका रुपयांत पिकांना हजारो रुपयांचे संरक्षण दिले जाणार असल्याने पीक विम्यासाठी (Pik Vima Registration) नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik Pik Vima : पीकविमा योजनेंतर्गत नाशिक (Nashik) जिल्ह्यात भात पिकाला प्रतिहेक्टर 49 हजारांचे संरक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर इतरही पिकांना पीक विमा संरक्षण योजनेंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आजच पीक विमा योजनेचा अर्ज करून पिकाला संरक्षण द्याव्यायचे आहे. शिवाय केवळ एका रुपयांत पिकांना हजारो रुपयांचे संरक्षण दिले जाणार असल्याने पीक विम्यासाठी (Pik Vima Registration) नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून (Agri) करण्यात आले आहे. 

खरीप हंगामात (Kharip Season) पिकांच्या पेरणीपासून (Sowing) ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकुल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा योजना 2023 मध्ये लागू केली आहे. केवळ एक रुपया भरून पीकविम्यासाठी www.pmfby.gov.in पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर लॉगीन करून किंवा नजीकच्या CSC/VLE केंद्रात निव्वळ एक रूपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते. यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तुर, मका ही तृणधान्य व कडधान्य तसेच भुईमूग, कारळा, सोयाबिन ही गळीत धान्य पीके आणि कापूस खरीप कांदा ही नगदी पिके अधिसूचित केलेल्या क्षेत्रात लागू राहतील.

त्यानुसार पिकांच्या पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग इत्यादी बाबींमुळे आणि हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट तसेच खरप हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान किंवा हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लागवड न झाल्यामुळे होणारे नुकसानीचा पिकविम्यात समावेश आहे. त्याचप्रमाणे पिकाच्या काढणीनंतर नुकसान झाल्यास देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनी बांधील असणार आहे. पात्र लाभार्थी कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना ऐच्छिक असली तरी या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

कोणत्या पीक विम्याला संरक्षण 

दरम्यान पीक विमा संरक्षण योजनेच्या जनजागृतीसाठी नाशिक जिल्ह्यात दोन प्रचाररथ तयार करण्यात आले असून प्रचाररथाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. या पीक विमा योजनेत पिकनिहाय प्रति. हेक्टर विमा संरक्षित रक्कम लागू असणार आहे. भात 49 हजार 500, ज्वारी 30 हजार, बाजरी 30 हजार, नागली 13 हजार 750, मका - रूपये 35 हजार 598, तूर 36 हजार 800, मुग 20 हजार, उडीद 20 हजार, भुईमूग 42 हजार 900, कापूस 49 हजार 500, कारळे 13 हजार 750, सोयाबिन 49 हजार 500, खरीप कांदा 81 हजार रुपये इतके पीक विमा संरक्षण मिळणार आहे. 

ही कागदपत्रे आवश्यक 

शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया विमा हप्ता भरावयाचा आहे. यासाठी महा ई सेवा केंद्र, सामुदायिक सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींचे संग्राम केंद्र, राष्ट्रीयकृत बँका येथे पीक विमा काढता येईल. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 7/12 उतारा, खाते उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, पीक पेरणी स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget