पेट्रोल 20 पेसै तर डिझेलचे दर 19 पैशांनी स्वस्त
मुंबईत पेट्रोलचे दर 20 पेसै तर डिझेलचे दर 19 पैशांनी कमी झाले आहे. मुंबईत पेट्रोल 88.72 रुपये आणि डिझेल 76.38 रुपयांना विकलं जात आहे.

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही कमी झाले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर 20 पेसै तर डिझेलचे दर 19 पैशांनी कमी झाले आहे. मुंबईत पेट्रोल 88.72 रुपये आणि डिझेल 76.38 रुपयांना विकलं जात आहे.
नवी दिल्लीतही पेट्रोल 21 पैसे आणि डिझेल 18 पैशांनी स्वस्त झालं आहे. नवी दिल्लीत पेट्रोल 78.21 रुपये आणि डिझेल 72.89 रुपयांना विकलं जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती 18 ऑक्टोबरपासून घसरण होत आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने इंधनाचे दर घसरले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती 14 डॉलरहून अधिक कमी झाल्या आहेत.
मात्र, येत्या काळात तेलाच्या किमती वाढ होण्याच शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेने इराणकडून तेल खरेदीवर बंदी घातली आहे. इराणवरील बंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढ होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
