एक्स्प्लोर

केंद्राकडून पेट्रोल-डिझेल दरांत कपात; राजस्थान केरळकडूनही दिलासा, महाराष्ट्र सरकारही कपात करणार?

Petrol Diesel Price Today 22 May 2022 : केंद्राकडून पेट्रोल, डिझेल दरात कपात करण्यात आल्यानंतर राजस्थान केरळचाही जनतेला दिलासा. महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेणार? याकडे लक्ष.

Petrol Diesel Price Today 22 May 2022 :  केंद्र सरकारनं इंधनांच्या अबकारी करात कपात करण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री 12 वाजल्यापासून देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) लागू करण्यात आले. केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरांत घट करण्यात आल्यानंतर देशभरात पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेल (Diesel Price) स्वस्त झालं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्य सरकारांनी देखील कर कमी करावेत, असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारही इंधनावरील व्हॅट कमी करणार का? याकडं लक्ष लागलं आहे. 

केंद्रानं अबकारी करात कपात केल्यानं देशात पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे आधीच महागाईच्या गर्ते सापडलेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्रापाठोपाठ केरळ आणि राजस्थाननंही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात इंधनावरील करामुळे पेट्रोल आणि डिझेल शेजारच्या राज्यांपेक्षा तुलनेनं महाग मिळतं. आता मोदी सरकारनं दिलासा दिल्यानंतर राज्य सरकारनंही इंधनावरील कर कमी करावा अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार इंधनावरील कर कमी करुन राज्यातील जनतेला दिलासा देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

काँग्रेसशासित राजस्थान सरकारकडून व्हॅटमध्ये कपात

केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर कमी केल्यानंतर काँग्रेसशासित राजस्थान सरकार आणि केरळ सरकारनंही व्हॅटमध्ये कपात केली आहे. पेट्रोलवरील व्हॅट 2 रुपये 48 पैसे आणि डिझेलवरील कर 1 रुपये 16 पैसे प्रति लिटरने कमी करण्याचा निर्णय राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घेतला आहे. त्यामुळे राजस्थानात पेट्रोल 10 रुपये 48 पैसे तर डिझेल 7 रुपये 16 पैसे स्वस्त होणार आहे. केरळनंही पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 2 रुपये 41 पैसे तर डिझेलवरील व्हॅट 1 रुपया 36 पैशांनी कमी केला आहे. केंद्राच्या कालच्या घोषणेनंतर राजस्थान आणि केरळच्या नागरिकांना दुहेरी फायदा मिळणार आहे. मात्र असाच निर्णय महाराष्ट्र सरकार कधी घेणार याकडं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र सरकारही पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

जाणून घ्या देशातील महत्त्वाच्या महानगरांतील किमती

शहरं  पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 111.35 97.28
दिल्ली 96.72 89.62
चेन्नई 102.63 94.24
कोलकाता  106.03 92.72

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremonyमहायुती 2.O सरकारचा शपथविधी,सागर बंगल्याबाहेर 'महाराष्ट्र थांबणार नाही'चे बॅनरTop 9 Sec Superfast News  : Maharashtra : Mahayuti Oath Ceremony : महायुतीचा शपथविधी : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : Superfast News : महायुतीचा शपथविधी : 05 Dec 2024 : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : Devendra Fadnavis घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, शिंदेंचा निर्णय गूलदस्त्यातच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
Eknath Shinde & Devendra Fadnavis: वर्षा बंगल्यावरील अँटी चेंबरमध्ये फडणवीस-शिंदेंमध्ये नेमकी काय डिल झाली? गृहखात्याच्या मोबदल्यात शिवसेनेला कोणतं महत्त्वाचं खातं मिळणार?
देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंमध्ये नेमकी कोणती डिल झाली? शिवसेनेला गृहखात्याच्या मोबदल्यात कोणतं खातं मिळणार?
Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई अखेर यशस्वी
देवाभाऊंच्या मनधरणीला यश आलं, एकनाथ शिंदे आझाद मैदानावर उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेणार
Embed widget