मुंबई, पुण्यातील लोकांना राज्यातील अन्य जिल्ह्यात जाण्यास परवानगी नाही
मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर विशेषत: कामगार, मजुरांना जाण्याची परवानगी आहे. अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल.

मुंबई : लॉकडाऊन 3 ची घोषणा झाली असली तरी या लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता देण्यात आली आहे. यामध्ये काही प्रमाणात प्रवासाची परवानगीदेखील देण्यात आली आहे. मात्र अनेकांना याबाबत काही संभ्रम आणि गैरसमज आहेत. मात्र मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती आहे.
पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर नागपूर आदी) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत. पोलीस आयुक्तांना असे अधिकार असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.
मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) जाण्याची परवानगी आहे. अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलीस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठवली जाईल. अर्जाची छाननी करुन नियमानुसार आणि तेथील कोविड-19 प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
त्यामुळे अर्धवट किंवा अनधिकृत किंवा ऐकीव, सांगोवांगीने दिल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, कोणीही कुठेही धावाधाव करू नये. राज्य शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
- 'मातोश्री' बाहेरील सुरक्षा रक्षक असलेले तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
- लॉकडाऊनमधलं आगळं वेगळं लग्न, पुणे पोलिसांनी केलं कन्यादान
- नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्या 351 जणांना कोरोना; शहरातील गुरुद्वारा, लंगर साहिब परिसर सील
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
