एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते, थकबाकी द्या,अन्यथा बेमुदत उपोषण, संयुक्त कृती समितीचा इशारा
ST Mahamandal BUS Employee : 17 संघटनांचा सहभाग असलेल्या संयुक्त कृती समितीनं एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते व थकबाकी द्या,अन्यथा बेमुदत उपोषण करु असा इशारा सरकारला दिला आहे.
ST Mahamandal BUS Employee : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेने काल थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला आहे. तर दुसरीकडे 17 संघटनांचा सहभाग असलेल्या संयुक्त कृती समितीनं एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते व थकबाकी द्या,अन्यथा बेमुदत उपोषण करु असा इशारा सरकारला दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचे, नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात एसटी प्रशासनाकडे एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने 27 ऑक्टोबर रोजी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संघटनेचा संप, सणात प्रवाशांची गैरसोय होणार?
सध्या एसटी महामंडळ दुर्देवाने एस.टी. कर्मचा-यांच्या आत्महत्येच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामध्ये विशेषत: एस.टी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यामुळे आत्महत्या केल्याचे मयत कर्मचा-यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे ही बाब अत्यंत गंभीर असुन हृदयाला चटका लावणारी आहे.एस.टी. कर्मचा-यांना अत्यंत कमी पगार असल्याने त्यातच अनेक विभागात लॉकडाऊन हजेरी न दिल्याने रोख वेतन (निव्वळ देय) अत्यंत कमी होणार असल्याने दिपावलीसारख्या मोठया सणामध्ये एवढया कमी पैशात सण साजरा करणे जिकरीचे ठरणार आहे. कारण अनेक कर्मचा-यांनी मुलभूत गरजा भागविण्यासाठी कर्ज काढलेले आहे तसेच घरभाडे, राशन, आई-वडीलांचे आजारपण, मुलांचे शिक्षण इतर कर्ज, उसणवारी या देणी असल्याने दिवाळी सण साजरा करणे पगारात शक्य नाही. त्यामुळे एस.टी.कर्मचा-यांचे वेतन व महागाई भत्ता थकबाकी, वार्षीक वेतनवाढीची थकबाकी, घरभाडे भत्त्याची थकबाकी देणे आवश्यक असल्याचे मुकेश तिगोटे यांनी सांगितले.
आली लहर केला कहर... रात्री गावाकडे जाण्यासाठी वाहन न मिळाल्यामुळे तरुणांनी बस पळवली!
रा. प. कर्मचा-यांना दिपावलीचा सण साजरा करण्यासाठी माहे माहे ऑक्टोबर देय नोव्हेंबर महिन्याचे वेतन1 नोव्हेंबर रोजी दिवाळीपुर्वी अदा करण्यात यावे तसेच एकतर्फी वेतनवाढ लागू करताना 1 एप्रिल, 2016 पासून शासनप्रमाणे महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर 3%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% देण्याचे मान्य केले होते परंतु अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे शासनाप्रमाणे भत्ते देऊन थकबाकीची रक्कम एक रकमी दिपावलीपुर्वी देण्यात यासह विविध मागण्या करीता महाराष्ट्र एसटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने 27 ऑक्टोबर रोजी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
वेळेवर पगार न झाल्याने एसटी चालक तरुणाची आत्महत्या; आजी-आजोबांवर नातवाला सांभाळण्याची वेळ
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील संयुक्त कृती समितीत महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक), महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन यासह एकूण 17 संघटना सहभागी आहेत.
महामंडळ राज्य शासनात विलीन करा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला आहे. त्यामुळे जरा ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला तर राज्यातील ग्रामीण भागात प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार आता नेमकी काय भूमिका घेत याकडे लक्ष लागलं आहे. गेल्या दिवाळीच्या वेळीही एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेनं राज्यभर आक्रोश आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने परिवहन मंडळाला एक हजार कोटींचं पॅकेज मंजूर केलं होतं. नंतर परिवहन महामंडळाला एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देणं शक्य झालं होतं. काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना देखील समोर आल्या होत्या. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या रोषाचा सामना आता सरकार कसं करतं याकडे लक्ष लागून आहे.