एक्स्प्लोर

आली लहर केला कहर... रात्री गावाकडे जाण्यासाठी वाहन न मिळाल्यामुळे तरुणांनी बस पळवली!

रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्याने दारुच्या नशेत लातूरमधील शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवून नेली.

लातूर : रात्री उशिरा गावाकडे जायला एसटी नाही म्हणून बस स्थानकातून एसटीच पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकातील ही घटना आहे. दारुच्या नशेत तरुणांनी हे कृत्य केल्याचं समजतं.

रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्याने दारुच्या नशेत शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवून नेली. एसटी पळवताना लाईटच्या दोन खांबांना देखील जोरात धडक बसल्याने विजेच्या तारा तुटून खाली पडल्या, शिवाय विजेचा खांब देखील कोसळला आहे.

आली लहर केला कहर... रात्री गावाकडे जाण्यासाठी वाहन न मिळाल्यामुळे तरुणांनी बस पळवली!

बस स्थानकात झोपलेल्या चालक आणि वाहकाला पहाटेच्या सुमारास एसटी जागेवर नसल्याचं समजताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार औराद पोलिसांनी एसटीचा शोध घेतल्यानंतर शेळगी गावात एसटी सापडली.

आली लहर केला कहर... रात्री गावाकडे जाण्यासाठी वाहन न मिळाल्यामुळे तरुणांनी बस पळवली!

या घटनेत एसटीचं 25 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. मात्र एसटी खात्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात नसल्याने गुन्हाच नोंदवलेला नाही. एसटी खात्याचा गलथानपणा या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. परंतु एसटी नेमकी कोणी पळवून नेली? एसटी पळवणाऱ्यांना पोलीस प्रशासन आणि एसटी खातं पाठिशी घालण्याचा प्रयत्न करतंय का असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

दरम्यान संबंधित एसटी बस स्थानक छोटं असल्याने तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. परिणामी एसटी पळवून नेणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यास काहीशी अडचण येऊ शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर

मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre : विधानसभेसाठी मविआचे कोणते मुद्दे चर्चेत? जिकंणार कोण?Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीकाAnil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget