एक्स्प्लोर

राज्यासाठी 18 सप्टेंबरचा दिवस मोठा, विशेष अधिवेशनासह दोन महत्त्वाच्या सुनावण्या होणार

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या  याचिकेवरही सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.  

 मुंबई : 18 सप्टेंबरचा दिवस हा अतिशय मोठ्या घडामोडींचा असणार आहे. कारण याच दिवशी तीन मोठ्या घडामोडी घडणार आहे. याच दिवशी संसदेच्या विशेष अधिवेशनाला(Special Parliment Session)  सुरुवात होणार आहे.  तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या केसेसची सुनावणी पार पडणार आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission)   निकालाविरोधात ठाकरे गटाच्या  याचिकेवरही सुनावणी होणारेय. त्यामुळे आजच्या दिवसाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.  

जेव्हापासून महाराष्ट्रात सत्तांतर झाले त्या दिवसापासून संपूर्ण राज्याची नजर ही सुप्रीम कोर्टाच्या घडामोडींकडे असते. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी अजूनही पुढचा भाग बाकी आहे. कारण विधानसभा अध्यक्षांकडे सुप्रीम कोर्टाने काही अधिकार सोपावले आहेत. त्यानंतर सु्प्रीम कोर्ट काय करते? याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. त्याच दृष्टीने 18 सप्टेंबरचा दिवस महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे. पहिली सुनावणी  निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सु्प्रीम कोर्टाने  याचिका दाखल केली आहे. त्यासंदर्भात अद्याप कोणतीच सुनावणी झाली नाही. या संदर्भातील सुनावणी 18 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. कोर्ट त्यासंदर्भात काय म्हणेल? याची उत्सुकता आहे. विधानसभा अध्यक्ष सुनावणीला उशीर करतात त्यासंदर्भात ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे.  विधानसभा  अध्यक्षांनी सुनावणीला सुरुवात केली आहे. एक दिवस देखील पार पडला आहे. याविषयी कोर्ट अध्यक्षांच्या कामकाजाविषयी काय टिप्पण्णी करते हे महत्त्वाचे आहे. 

अधिवेशनाचा अजेंडा काय? सस्पेन्स कायम 

केंद्र सरकारनं (Modi Government) संसदेचं विशेष अधिवेशन (Parliament Special Session) बोलावलं आहे. 18 सप्टेंबरपासून संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी संसदीय कामकाज सध्याच्या वास्तूत होणार आहे.  दुसऱ्या दिवशी म्हणजे 19  सप्टेंबरपासून  नव्या संसदेतून कामकाजाला सुरुवात होणार आहे. 19  सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आणि हाच मुहूर्त पाहून संसदेच्या नव्या वास्तूत कामकाजाचा श्रीगणेशा होणार आहे.    पण या अधिवेशनाचा अजेंडा काय असणार याबद्दल मात्र सस्पेन्स कायम आहे. एक देश, एक निवडणूक, तसेच भारत विरुद्ध इंडिया या विषयांची चर्चा होत असतानाच आता ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातील रोहिणी आयोगाचा (Rohini Aayog) अहवाल पटलावर मांडण्याची शक्यता वर्तवली जातेय.

हे ही वाचा :                 

संसद कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेश तयार, विशेष अधिवेशनात संसद अधिकारी आणि कर्मचारी दिसणार नव्या ड्रेस कोडमध्ये

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shoumika Mahadik: त्यामुळे गोकुळच्या सभेत मी व्यासपीठावर बसणार नाही; संचालिका शौमिका महाडिक काय काय म्हणाल्या?
त्यामुळे गोकुळच्या सभेत मी व्यासपीठावर बसणार नाही; संचालिका शौमिका महाडिक काय काय म्हणाल्या?
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदासाठी 'सतेज' धावा अन् मनसे एन्ट्रीवर 'राज' मंथन; मातोश्रीवर बैठकीत काय काय घडलं?
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदासाठी 'सतेज' धावा अन् मनसे एन्ट्रीवर 'राज' मंथन; मातोश्रीवर बैठकीत काय काय घडलं?
Vice President Election :  2017 मध्ये UPA, 2022 मध्ये NDA उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या पक्षाचा मोठा निर्णय, उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदानापासून दूर राहणार
उपराष्ट्रपती निवडणूक काही तासांवर, कधी UPA तर कधी NDA उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या पक्षाचा मोठा निर्णय, मतदानापासून दूर राहणार
वाशीम हादरलं! दवाखान्यात चला म्हणणाऱ्या पत्नीला मनोरुग्ण पतीने संपवलं, नंतर स्वतःही गळफास घेतला
वाशीम हादरलं! दवाखान्यात चला म्हणणाऱ्या पत्नीला मनोरुग्ण पतीने संपवलं, नंतर स्वतःही गळफास घेतला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shoumika Mahadik: त्यामुळे गोकुळच्या सभेत मी व्यासपीठावर बसणार नाही; संचालिका शौमिका महाडिक काय काय म्हणाल्या?
त्यामुळे गोकुळच्या सभेत मी व्यासपीठावर बसणार नाही; संचालिका शौमिका महाडिक काय काय म्हणाल्या?
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदासाठी 'सतेज' धावा अन् मनसे एन्ट्रीवर 'राज' मंथन; मातोश्रीवर बैठकीत काय काय घडलं?
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदासाठी 'सतेज' धावा अन् मनसे एन्ट्रीवर 'राज' मंथन; मातोश्रीवर बैठकीत काय काय घडलं?
Vice President Election :  2017 मध्ये UPA, 2022 मध्ये NDA उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या पक्षाचा मोठा निर्णय, उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदानापासून दूर राहणार
उपराष्ट्रपती निवडणूक काही तासांवर, कधी UPA तर कधी NDA उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या पक्षाचा मोठा निर्णय, मतदानापासून दूर राहणार
वाशीम हादरलं! दवाखान्यात चला म्हणणाऱ्या पत्नीला मनोरुग्ण पतीने संपवलं, नंतर स्वतःही गळफास घेतला
वाशीम हादरलं! दवाखान्यात चला म्हणणाऱ्या पत्नीला मनोरुग्ण पतीने संपवलं, नंतर स्वतःही गळफास घेतला
अवघ्या दीड महिन्यात सैन्यातील पती अन् सासऱ्यांचे निधन, चिमुरडी लेक पदरात; खडतर संघर्षात खचून न जाता कोल्हापूरच्या प्रियांका खोत यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती
अवघ्या दीड महिन्यात सैन्यातील पती अन् सासऱ्यांचे निधन, चिमुरडी लेक पदरात; खडतर संघर्षात खचून न जाता कोल्हापूरच्या प्रियांका खोत यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती
Uddhav Thackeray & Raj Thackeray: राज ठाकरेंच्या मनसेला मविआत घ्यायचं का? मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा, हायकमांड काय करणार?
राज ठाकरेंच्या मनसेला मविआत घ्यायचं का? मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा, हायकमांड काय करणार?
Kolhapur News : कोल्हापुरात मद्यपी टोळक्याकडून खासगी बसवर दगडफेक आणि चालकावर चाकूहल्ला
कोल्हापुरात मद्यपी टोळक्याकडून खासगी बसवर दगडफेक आणि चालकावर चाकूहल्ला
काँग्रेस नेत्यांची थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत बैठक; विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा
काँग्रेस नेत्यांची थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत बैठक; विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा
Embed widget