एक्स्प्लोर
राहुल गांधी झोपेत होते की दारु प्यायले होते? : लोणीकर
"नरेंद्र मोदींवर जर कोणी टीका करत असेल तर इट का जवाब पत्थर से द्या. टीका करणाऱ्यांच्या सभा उधळा, पुतळे जाळा आणि त्यांचा निषेध करुन बातम्या छापून आणा,"
परभणी : रावसाहेब दानवे, सुभाष देशमुख यांच्यानंतर आता भाजपचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची भाषा घसरली आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर बोलताना लोणीकरांचा तोल गेला.
बबनराव लोणीकर यांनी मिमिक्री करत राहुल गांधींच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केली. "राहुल गांधी झोपेत होते की दारु प्यायले होते? ज्याला कोणी पोरगी देत नाही, ज्याचं लग्न होत नाही तो मोदी, मोदी का करतो? भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याचे पुतळे जाळायला हवे होते," असं लोणीकर म्हणाले.
"नरेंद्र मोदींवर जर कोणी टीका करत असेल तर इट का जवाब पत्थर से द्या. टीका करणाऱ्यांच्या सभा उधळा, पुतळे जाळा आणि त्यांचा निषेध करुन बातम्या छापून आणा," असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
करमणूक
Advertisement