एक्स्प्लोर
मशाल घेऊन राज्यभर दौरा करणार; पकंजा मुंडे यांची पुन्हा एकदा संघर्षाची हाक
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका जाहीर करत पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. सोबतच राज्यभर मशाल घेऊन राज्यभर दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बीड : भाजप पक्ष मी सोडणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी आपल्या आजच्या भाषणातून ठासून सांगितलं. तसंच 27 जानेवारीला औरंगाबादमध्ये उपोषण करणार असून त्यानंतर राज्यभर मशाल दौरा करणार असल्याचा निश्चय पंकजांनी केलाय. सोबतच कोअर कमिटीतून मला मुक्त करा, असं आवाहनच पंकजांनी केलंय. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या जन्मदिनानिमित्त परळीत पार पडलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. तर दुसरीकडे गोपीनाथगडावरील मेळाव्याच्या व्यासपीठावरुन भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या जन्मदिनानिमित्त परळीत पार पडलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
मुठभर लोकांचा पक्ष आज बहुजनांचा झालाय. पण हा पक्ष पुन्हा रिव्हर्समध्ये जाऊ नये. बहुजनांचा पक्ष पुन्हा मुठभर लोकांच्या हाती जाऊ नये, अशी सुचना देताना भाजपच्या नेत्या पकंजा मुंडे यांनी पुन्हा एकदा संघर्षाची हाक दिलीय. बेईमानी आपल्या रक्तात नाही. आपण पक्ष सोडणार नाही, जर पक्षाला आपल्यावर कारवाई करायची असेल करा, असा सूचक इशाराही पंकजा मुंडेंनी दिलाय. आपण कुठल्याही पदासाठी दबावाचा वापर केला नाही. जर कुणाला तसं वाटत असेल तर कोअर कमिटीतून आपण बाहेर पडत असल्याची घोषणाही पंकजांनी केलीय. त्यामुळं पक्षांतर्गत दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न पकंजा आणि एकनाथ खडसेंनी केल्याचं पाहायला मिळतंय. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आज मेळावा पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. त्याचबरोबर बीड जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो कार्यकर्ते मेळाव्यात सहभागी झाले होते. या मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडेंनी आपली खदखद बोलून दाखवलीय.
तर, पक्षावर नाराज नाही म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंनी परळीतील मेळाव्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधातही खदखद जाहीरपणे बोलून दाखवली आहे. नेते पक्ष सोडून जातील अशी वागणूकच का दिली जातेय, असा सवाल उपस्थित करत फडणवीस नेत्यांना त्रास देत असल्याचा थेट आरोप खडसेंनी केलाय.
राग माणसावर काढा, पक्षावर नको -
पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंच्या नाराजीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपीनाथगडावर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. चुका माणसांकडून होतात. त्याचा राग पक्षावर कशाला काढता, अशा शब्दात पाटलांनी दोन्ही नाराज नेत्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या वेदना, खंत समजू शकतो. पक्ष त्याची दखल घेईल, असा शब्द पाटलांनी दिला. त्याचबरोबर मराठी शब्द जरा जपून वापरा, उद्या सगळं ठिक झाल्यावर आपल्याला अपराधी वाटायला नको, अशा शब्दात पाटील यांनी खडसे आणि पंकजांना समजावून सांगितलं.
हेही वाचा -
मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर निर्णय घ्यावा : पंकजा मुंडे
घाबरु नका, मुख्यमंत्री माझा भाऊच आहे : पंकजा मुंडे
Pankaja Munde | मी पक्ष सोडणार नाही, गोपीनाथ गडावरील मेळाव्यात पंकजा मुंडे यांचं भाषण | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement