![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
बीडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहित; मंत्री धनंजय मुंडे यांच्यांवर पंकजा मुंडे यांचे पत्रातून आरोप
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना एक पत्र लिहून बीड जिल्ह्याचा लसीच्या बाबतीत दुजाभाव होत असल्याचा आरोप केलाय. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही आरोप केलेत.
![बीडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहित; मंत्री धनंजय मुंडे यांच्यांवर पंकजा मुंडे यांचे पत्रातून आरोप Pankaja Munde letter to health minister over corona vaccine allegations against Dhananjay Munde बीडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहित; मंत्री धनंजय मुंडे यांच्यांवर पंकजा मुंडे यांचे पत्रातून आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/19/229cd36195260e104b051ec5e7279c15_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड: जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय तर दुसरीकडे रेमडीसीव्हर औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राकडून आलेल्या लसीमध्ये बीड जिल्ह्याला सर्वात कमी लस मिळाल्याचा आरोप करत यासंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहीत आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
काय म्हटलंय पत्रात?
सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बीडमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 729 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर बाधितांची संख्या 35 हजाराच्या आसपास गेली आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा पुर्ण ताकदीने रूग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रूग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रूग्णसंख्या वाढीत भर पडत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे या कोव्हिड सेंटर मध्ये जाऊन रुग्णाशी चर्चा करताहेत, प्रशासनासोबत बैठका घेऊन माहिती गोळा करत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे कुठे आहेत असा सवाल भाजप कार्यकर्ते सोशल मीडियातून विचारत आहेत
बीड जिल्ह्याला मिळाले केवळ लसीचे 20 डोस
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आलेल्या 2 लाख डोसेस पैकी बीडला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ 20 लसी मिळाल्या आहेत. ही अतिशय खेदजनक बाब असून पालकमंत्र्यांचं लक्ष कुठयं? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून पुरेसे डोसेस आणि इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)