एक्स्प्लोर
‘एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनती’ : पंकजा मुंडे
ऑनलाईन बदल्यांचा निर्णय घेतल्याबद्दल शिक्षक आणि शिक्षक संघटनांकडून पंकजा मुंडेंचा सत्कार करण्यात आला.

बीड : राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला. अनेकांच्या दबावाला न जुमानता हा निर्णय घेतला असल्याचं सांगत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, की ‘एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनती’
शिक्षक संघटनांकडून बीड शहरात पंकजा मुंडेंच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. ऑनलाईन बदल्यांचा निर्णय घेतल्याबद्दल शिक्षक आणि शिक्षक संघटनांकडून पंकजा मुंडेंचा सत्कार करण्यात आला.
''निर्णयाला आमदारांचा विरोध होता''
''हा निर्णय घेताना दबाव होता. अनेक आमदार असा निर्णय घेऊ नका असं म्हणत होते. मात्र या दबावाला बळी न पडता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने ऑनलाईन बदलीचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातल्या जवळपास सव्वा लाखापेक्षा जास्त शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या. इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतक्या पारदर्शक पद्धतीने या बदल्या झाल्या,'' असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
''यापूर्वी जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हस्तक्षेप होता. म्हणूनच लाखो रुपये देऊनही शिक्षकांना हवी त्या ठिकाणी बदली करता येत नव्हती. मात्र या ऑनलाईन बदलीच्या निर्णयामुळे शिक्षकांना पाहिजे असलेली शाळा मिळू शकली आणि म्हणूनच राज्यातले अनेक शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ज्या शिक्षकांनी इथून पुढे आपली बदली होणं शक्य नाही, असं गृहित धरलं होतं अशा शिक्षकांनाही ऑनलाईन प्रक्रियेचा फायदा मिळाला,'' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
आपण एकदा निर्णय घेतला की तो माझा घेत नाही हे सांगताना पंकजा मुंडे यांनी फिल्मी डायलॉगही मारला. ''एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनती’, असा डायलॉग त्यांनी मारला. या डायलॉगनंतर उपस्थित शिक्षकांमध्ये एकच हशा पिकला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
भारत
मुंबई
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
