एक्स्प्लोर

Pankaja Munde Exclusive : महाविकास आघाडी सरकार नापास म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नापास: पंकजा मुंडे

मुख्यमंत्री जरी एका पक्षाचे असले तरी सरकार मात्र दुसराच पक्ष चालवत असल्याचं दिसतंय असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. 

बीड : उध्दव ठाकरे यांच्याविषयी पहिल्यांदाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळीवर नापास झालं आहे आणि सरकार नापास म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नापास असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कामगिरीवर भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कामगिरीचे विश्लेषण करताना त्या म्हणाल्या की, "राज्य सरकारचे विश्लेषण करायचं म्हटल्यावर उद्धव ठाकरे या व्यक्तीविषयी लोक चांगला विचार करतात. पण या सरकारविषयी चांगला विचार करत नाहीत. ठाकरे सरकार सर्वच पातळीवर नापास झालं आहे. तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये गोंधळ सुरू आहे. राज्य सरकार नापास म्हटल्यावर मुख्यमंत्री ठाकरे हे नापास झाले आहेत."

राष्ट्रवादीला जास्त फायदा
भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, "या सरकारमध्ये एका पक्षालाच जास्त फायदा होतोय. मुख्यमंत्री एका पक्षाचे असले तरी सरकार हा दुसराच पक्ष चालवतोय. सर्वाधिक निधी हा राष्ट्रवादीला मिळतोय. त्यामुळे लाल फितीचा कारभार वाढला असल्याचं दिसून येतंय. या सरकारच्या काळात एकही नवीन योजना, लोकप्रिय योजना ही आतापर्यंत आली नसल्याचं दिसतंय. कोरोनाचे कारण दिलं जातंय पण आता कोरोना संपलाय. सरकार जनतेच्या हिताचं काम करत नाही."

गोपीनाथ मुंडे असताना भाजप आणि शिवसेना एकत्र होती. पण आता हे दोन पक्ष एकमेकांचे कट्टर शत्रू झालेत का असा प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणात कोणीही कोणाचं कायमचं मित्र वा शत्रू असतं असं नाही. या आधी दोन्ही पक्ष एकाच विचारधारेचे होते त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र होते. आता सध्या तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्रित आले आहेत. भविष्यात समान विचारांचे पक्ष एकत्रित येतील.

ओबीसीच्या प्रत्येक प्रश्नावर आपण सक्रिय असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. किरीट सोमय्या, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्याविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, या नेत्यांचा अजेंडा काही नकारात्मक नाही. पण जर हे नेते काही चुकीचं बोलत असतील तर पक्षीय पातळीवर त्याचा विचार केला जाईल. 

महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET पेपरफुटी प्रकरण, ZP शिक्षकाच्या बँक खात्यात मोठी उलाढाल;  आरोपीला आणखी 2 दिवसांची सीबीआय कोठडी
NEET पेपरफुटी प्रकरण, ZP शिक्षकाच्या बँक खात्यात मोठी उलाढाल; आरोपीला आणखी 2 दिवसांची सीबीआय कोठडी
Manoj jarange :
"भुजबळांचे ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर 288 पैकी एकही निवडून येऊ देणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
Rohit Pawar : गृहमंत्री झोपले आहेत का? पालकमंत्री  कुठं आहेत? पोलिसांवर हल्ले होऊ लागले; रोहित पवारांचा हल्लाबोल
गृहमंत्री झोपले आहेत का? पालकमंत्री कुठं आहेत? पोलिसांवर हल्ले होऊ लागले; रोहित पवारांचा हल्लाबोल
Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rani Lanke Ahmednagar : आंदोलनस्थळी चूल पेटवून,स्वयंपाक करत राणी लंकेंकडून सरकारचा निषेधNahsik Ramkund Goda Aarti:रामकुंड परिसरात गोदा आरतीवरून रामतीर्थ सेवा समिती-पुरोहित संघात पुन्हा वादRavindra waikar clean chit | आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी, संजय राऊतांची खोचक टीका ABP MajhaSant Sopankaka Palkhi Ringan :  संत सोपानकाकांच्या पालखीचा रिंगण सोहळा, याची देही पाहावा असा सोहळा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET पेपरफुटी प्रकरण, ZP शिक्षकाच्या बँक खात्यात मोठी उलाढाल;  आरोपीला आणखी 2 दिवसांची सीबीआय कोठडी
NEET पेपरफुटी प्रकरण, ZP शिक्षकाच्या बँक खात्यात मोठी उलाढाल; आरोपीला आणखी 2 दिवसांची सीबीआय कोठडी
Manoj jarange :
"भुजबळांचे ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर 288 पैकी एकही निवडून येऊ देणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
Rohit Pawar : गृहमंत्री झोपले आहेत का? पालकमंत्री  कुठं आहेत? पोलिसांवर हल्ले होऊ लागले; रोहित पवारांचा हल्लाबोल
गृहमंत्री झोपले आहेत का? पालकमंत्री कुठं आहेत? पोलिसांवर हल्ले होऊ लागले; रोहित पवारांचा हल्लाबोल
Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
चंद्रकांत पाटील का संतापले? फोनवरुन समोरच्याला ओरडतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
चंद्रकांत पाटील का संतापले? फोनवरुन समोरच्याला ओरडतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
Sanjay Raut on Mahayuti : फडणवीस, अजित पवार आणि शिंदे तुमचे तिन्ही स्टंप उडणार; संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
फडणवीस, अजित पवार आणि शिंदे तुमचे तिन्ही स्टंप उडणार; संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
Water Storage : जून लोटला तरीही दमदार पावसाची प्रतीक्षाच! धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट, ठिकठिकाणी पेरण्या खोळंबल्या
जून लोटला तरीही दमदार पावसाची प्रतीक्षाच! धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट, ठिकठिकाणी पेरण्या खोळंबल्या
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी विधानसभेला शड्डू ठोकला; बुलडाण्यातील सर्व जागा लढवण्याची केली घोषणा
रविकांत तुपकरांनी विधानसभेला शड्डू ठोकला; बुलडाण्यातील सर्व जागा लढवण्याची केली घोषणा
Embed widget