Rain : मी शेतकऱ्यांचं नुकसान वाचवतो, पण माझंच नुकसान झालंय; पंजाबराव डख यांचं सोयाबिन गेलं वाहून
Rain : परभणी (Parbhani) जिल्ह्यात राहणारे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख (Panjabrao dukh) यांच्या गावातही मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी व पूरस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं.
Rain : परभणी : हवामान खात्याचा अचूक अंदाज वर्तवरणारे हवमान अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंजाबराव डख यांचा हवामानाचा अंदाज गतवर्षी चुकला होता. मात्र, आपण वर्तवत असलेल्या हवामान अंदाजामुळे हजारो शेतकऱ्यांचा फायदा होतो, हजारो शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज बांधून पेरणी व शेतीची मशागत करता येते. त्यामुळे, शेतीचं उत्तम नियोजन करुन संभाव्य धोका टाळता येतो, असा दावाही पंजाबराव डख यांच्याकडून गेला जातो. मात्र, मराठवाड्यातील यंदाच्या मुसळधार पावसामुळे चक्क पंजाबराव डख यांच्याही शेतीचं अनोतान नुकसान झालं आहे. मराठवाडा आणि विदर्भात कालपासून पावसाने धो धो हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर, शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.
परभणी (Parbhani) जिल्ह्यात राहणारे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख (Panjabrao dukh) यांच्या गावातही मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी व पूरस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं. या पूरस्थितीमुळे डख यांचेही मोठं नुकसान झालंय. गावातील अतिवृष्टीमुळे डख यांच्या शेततील 6-7 एकरमधील सोयाबीन पूर्णतः खरडून गेलं. परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय आणि याच पावसामुळे शेती पिकांच मोठे नुकसान झाले आहे. सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचंही या अतिवृष्टीमध्ये मोठे नुकसान झाले. डख यांचे सहा ते सात एकर सोयाबीन अतिवृष्टीमध्ये आलेल्या पाण्याने पूर्णतः वाहून गेले. त्यामुळे सरकारने या नुकसानीची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, असे आवाहन पंजाब डख यांनी केलं आहे.
शेतकरी बांधवांना येत्या दोन दिवसांमध्ये शेतातील सर्व कामे उरकून घ्यावीत. कारण येत्या दोन ते सहा सप्टेंबर दरम्यान राज्यभरामध्ये जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी व्यक्त केला होता. तसेच, जायकवाडी धरण ही 100% भरणार असल्याचेही डख यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगितलं होतं. एकप्रकारे डख यांचा हवामानाचा अंदाज खरा ठरला आहे. मात्र, पंजाबराव डख यांच्याच शेतातील सोयाबिन वाहून गेल्याने या पावसाचा मोठा फटका डख यांनाही बसला आहे.
मराठवाड्यात मुसळधार पाऊस
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसानं सर्वत्र एकच हैदोस घातला असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडवली आहे. तर अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती ओढावल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं आज देखील विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पावसाचा जोर लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत.
हेही वाचा
पोराच्या चुकीमुळे बापाचं घर पाडणं योग्य नाही; बुलडोझर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले