एक्स्प्लोर

विठ्ठल मंदिराला पुरातन दगडी फ्लोरिंग; 700 वर्षापूर्वीचे स्वरूप दिलं जाणार!

Pandharpur Vitthal Mandir Latest news : आता भाविकांना पुन्हा 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर पाहायला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नेमके काय बदल होणार?

Pandharpur Latest Update : 700 वर्षांपूर्वी म्हणजेच ज्ञानोबा, तुकाराम आदि संतांच्या काळातील विठ्ठल मंदिरात असलेले दगडी फ्लोरिंग पुन्हा भाविकांना दिसणार असून पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारकडे दाखल केलेल्या मंदिराच्या विकास आराखड्यानुसार आता मंदिरातील चकचकीत फारशी जाऊन पुरातन दगडी फ्लोरिंग केले जाणार असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले. विठ्ठल मंदिराला पुरातन रूप देणारा 61 कोटी 50 लाख रुपये खर्चाचा आराखडा सध्या मंजुरीसाठी राज्य सरकारकडे प्रलंबित असून लवकरच या रखडलेल्या आराखड्याला शासन मंजुरी देईल असे विधी व न्याय राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. यामुळे आता भाविकांना पुन्हा 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर पाहायला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विठ्ठल मंदिर आणि परिसराचा पहिल्यांदाच विकास आराखडा बनवून तो मंजुरीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला होता. आषाढी एकादशीच्या पूजेला आलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा आराखडा मंजूर करण्याचे आश्वासन देत सर्व प्रकारे मदतीचा विश्वास दिला होता. मात्र नंतरच्या काळात हा आराखडा पुन्हा मंत्रालयाच्या लाल फितीमध्ये अडकला असे वाटत असतानाच राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी रखडलेल्या विकास आराखड्याला राज्यातील आघाडी सरकार लवकरात लवकर मंजुरी देईल असे सांगितल्याने आता हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वाढली आहे. 

700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर कसे असेल याबाबत जगभरातील विठ्ठल भक्तांना उत्कंठा लागून राहिली असून मंजुरी मिळाल्यानंतर 5 वर्षात हे काम 6 टप्प्यामध्ये पूर्ण केले जाणार आहे. विठ्ठल मंदिर हे 11 व्या शतकातील असल्याचे अभ्यासक मनात असले तरी त्याहीपूर्वीपासून विठुरायाचे हे मंदिर अस्तित्वात असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. 

सातशे वर्षांपूर्वी त्याकाळातील दगडी फरशांचे फ्लोरिंग असल्याने आता मंदिराचे काम सुरु करताना त्याच पद्धतीचे फ्लोरिंग करण्याचा मंदिर समितीचा निर्णय असल्याचे व्यवस्थापक पुदलवाड यांनी सांगितले. विठ्ठल सभा मंडपात यासाठी दगडी दीपमाळेसमोरील नंतरच्या काळात झालेले फ्लोरिंग तोडून काढले असता हे पुरातन दगडी फ्लोरिंग उघडे पडले आहे. या दगडी फरशांवर त्याकाळात भाविकांनी दिलेल्या दगडांवर कानडी , तामिळ , तेलंगे अशा भाषेत काही मजकूर लिहल्याचेही दिसून येत आहे. आता संपूर्ण मंदिरात असे पूर्वीचे असलेले दगडी फ्लोरिंग उघडे करून त्याला गरजेनुसार पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार त्याच काळातील दगडी फरशा वरून बसविण्याची तयारी देखील मंदिर प्रशासनाने  केली  आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कारGadchiroli C60 Commando : नक्षल्यांचा खात्मा करणारी 'सी-60' आहे तरी कोण? Special ReportABP Majha Headlines : 08 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 26 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Chhaava :
"तो सीन डिलीट करा", छावा चित्रपटाच्या वादावरुन उदयनराजेंचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना फोन
Maharashtra Kesari 2025: पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं, मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं
Astrology : आज प्रजासत्ताकदिनी बनले मोठे शुभ योग; 3 राशींना होणार याचा मोठा लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
आज प्रजासत्ताकदिनी बनले मोठे शुभ योग; 3 राशींना होणार याचा मोठा लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात! 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील धनाढ्याची मुजोरी
'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात! 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील धनाढ्याची मुजोरी
Embed widget