एक्स्प्लोर
होळकर वाड्यासह पंढरपुरातील 123 इमारती धोकादायक
आषाढी वारीपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात 123 इमारती धोकादायक आढळल्या आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी हे सर्वेक्षण केलं जातं. यात श्रीमंत होळकर सरकार यांच्या ऐतिहासिक वाड्याचाही समावेश आहे.

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने केलेल्या धोकादायक इमारती सर्वेक्षणात पंढरपूर शहरातील 123 इमारती या धोकादायक आढळल्या आहेत. यात श्रीमंत होळकर सरकार यांच्या ऐतिहासिक वाड्याचाही समावेश आहे. आषाढी यात्रेत आलेला पारंपरिक वारकरी हा नेहमीच मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग भागात यात्रा काळात निवासी राहत असतो. ही निवासस्थाने वर्षानुवर्षे ठरलेली असून त्याच ठिकाणी हे वारकरी कुटुंबे उतरत असतात. मंदिराजवळ रहायला मिळावे हा या मागचा मुख्य हेतू असला तरी यातून स्वस्त दरात राहण्याची सोय होते. त्यामुळे अशा ठिकाणी राहणे वारकरी पसंत करतात. मात्र यातील अनेक इमारती धोकादायक बनल्याने यात्रा काळात दुर्घटना झाल्यास गंभीर प्रसंगाला सामोरं जावं लागतं. यामुळेच नगरपालिकेने शहरातील अशा 123 धोकादायक इमारतींवर नोटिसा लावल्या असून यात निवास न करण्याचं आवाहन पालिकेने केलं आहे. यामध्ये होळकर संस्थानच्या वाड्याचाही समावेश आहे. संबंधित जागा मालकांना याबाबत नोटीस दिली आहे.
आणखी वाचा























