एक्स्प्लोर

विश्वजीत कदमांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान तर 31 मे रोजी मतमोजणी होणार होती.

सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर भाजपाने माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उमेदवारी अर्ज भरणारे संग्रामसिंह देशमुख आणि जिल्हातील भाजप नेत्यामध्ये कडेपुर येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात बराच काळ चर्चा झाली. या चर्चेनंतर संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज मागे घेतल्याचं चंद्रकात पाटील यांनी जाहीर केलं. विद्यमान आमदार किंवा खासदार दिवंगत झाल्यास तिथे उमेदवार न उभा करण्याची आपली परंपरा भाजप कायम ठेवत असल्याचं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान तर 31 मे रोजी मतमोजणी होणार होती. रिक्त झालेल्या जागी काँगेसकडून यापूर्वीच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना विरोध म्हणून भाजपनेही जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज दाखल करुन खळबळ उडवून दिली होती. तर दुसरीकडे शिवसेनेने विश्वजित कदम यांना जाहीर पाठिंबा दिला होता. भाजपनेही उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अशी विनंती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली होती. मात्र आता भाजपबरोबरच सर्व अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे विश्वजित कदम बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Embed widget