धक्कादायक! विरारमध्ये अज्ञात व्यक्तीने केळीची बाग तोडून टाकली, शेतकऱ्याचं मोठं नुकसान, नुकसान भरपाई देण्याची मागणी
विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याची केळीची बाग अज्ञात व्यक्तीने तोडून टाकली आहे.
Palghar Virar News : विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याची केळीची बाग अज्ञात व्यक्तीने तोडून टाकली आहे. विरार पश्चिमेच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यालगत क्षितिज रिसॉर्टच्या बाजूला शेतकऱ्यांची केळीची बाग होती. सुभाष किणी आणि त्यांचा भाऊ प्रकाश किणी असं शेतकऱ्याचे नाव आहे.
अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
जुना सर्वे नंबर 196 आणि नवीन सर्वे नंबर 87 प्रमाणे 50.2 गुंठे ही जागा मूळ मालक सुभाष किणी आणि त्यांचा भाऊ प्रकाश किणी यांची वडिलोपरजी मालकीची जमीन आहे. वर्षानुवर्ष किणी कुटुंब हे शेतीच्या उत्पनातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहे. मात्रं त्यांच्या शेतातील केळीच्या झाडांची ज्ञात व्यक्तीने मोडतोड केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घ्यावी व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.
आमच्या बागेतील 100 ते 125 झाडे रात्रीत कापून टाकली, यावरच आमची उपजीविका होती
आमच्या बागेतील 100 ते 125 झाडे रात्रीत कापून टाकली आहेत. केळीचे घड देखील तोडून टाकले आहेत. आमची उपजीवीका याच केळीच्या बागेवर होती. मात्र, एका रात्रीत कोणीतरी आमची केळीची झाडे कापली असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिली आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. आताआम्ही काय करावं? असा सवाल शेतकऱ्याने केला आहे. पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. आमची जमीन आहे ती व्यवस्थित राहावी, आम्हाला त्रास होऊ नये अशी मागणी देखील शेतकऱ्याने केली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातही द्राक्ष बागेवर किटकनाशाची फवारणी करण्यात आली होती
महत्वाच्या बातम्या:
























