एक्स्प्लोर

पालघर पोटनिवडणूक: उद्धव ठाकरे-योगी आदित्यनाथ आमने-सामने

उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ यांची बुधवारी 23 मे रोजी नालासोपाऱ्यात जाहीर सभा होणार आहे.

मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपचा वाद टोकाला जाणार हे जवळपास निश्चित आहे. कारण या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेतच, शिवाय आता उत्तर भारतीय मतांना आकर्षित करण्यासाठी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांना भाजपने पाचारण केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे एकाच दिवशी म्हणजे 23 मे रोजी आमने सामने येणार आहेत. एकाच दिवशी सभा उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ यांची  बुधवारी 23 मे रोजी नालासोपाऱ्यात जाहीर सभा होणार आहे. नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार आहेत. मतदारांना आवाहन करण्यासाठी भाजपनं उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांना पाचारण केलं आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नालासोपाऱ्यात सभा घेत, शिवसेनेसह स्थानिक बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका केली होती. या सभेसाठीही भाजपचे उत्तर प्रदेशचे खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांची उपस्थिती होती.  इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकूरांवर हल्ला   दरम्यान, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, 23 मे री पोलिंसांच्या अधिक तुकड्या तैनात करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे-मुख्यमंत्री आमने-सामने पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनीही उडी घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पालघरमध्ये दोन जाहीर सभा होणार आहेत. नालासोपाऱ्याला 23 मे रोजी तर तर दुसरी सभा भोईसरला 25 मे रोजी होणार आहे. पालघर पोटनिवडणूक भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. 28 मे रोजी पोटनिवडणूक पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. नाना पटोले यांनी राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे भंडारा-गोंदियात पोटनिवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होईल. अब की बार..नहीं करेंगे गलती बार बार अब की बार..” नहीं करेंगे गलती बार बार, असं ट्विट करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. पेट्रोलच्या भाववाढीवरुन आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली. आदित्य ठाकरेंचं ट्विट ‘अब की बार..” नहीं करेंगे गलती बार बार’ असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं. मुंबईत पेट्रोल ₹ ८४!! २०१४ चा प्रचार विसरलोच... “बहुत हुई महंगाई की मार.. अब की बार..” नहीं करेंगे गलती बार बार. कर्नाटका निवडणुकीनंतर भाव वाढले.. कदाचित डिसेंबरमध्ये परत निवडणुकीसाठी कमी करतील.. पण भारतीय जनतेला वचनं दिली, ती पूर्ण का नाही करू शकत केंद्र सरकार? असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. संबंधित बातम्या  इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकूरांवर हल्ला   भाजपकडून माझ्या पतीच्या फोटोंचा गैरवापर, जयश्री वनगांची तक्रार  पालघर पोटनिवडणूक: शिवसेनेने भाजपचा प्रस्ताव फेटाळला  श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली   शेवटच्या दिवशीही भाजपची शिवसेनेला विनवणी, पालघरमध्ये नवा प्रस्ताव!   काँग्रेस नेते राजेंद्र गावित भाजपात, पालघरची उमेदवारी मिळणार    पालघर पोटनिवडणूक : शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांचा अर्ज दाखल    वनगांच्या मुलाच्या मेसेजला पाचव्या मिनिटाला मी रिप्लाय केला : मुख्यमंत्री   श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली   पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश   पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन   पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : Eknath Khadse यांचा फोन आला...म्हणाले,Aaditya Thackeray Majha Vision : खिचडीचा घोटाळा झाला की नाही? आदित्य ठाकरे म्हणतात... ABP MajhaAaditya Thackeray Majha Vision : आम्ही बोलायचो ते भाजपला टोचायचं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल...ABP Majha Headlines : 05 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Kartiki Gaikwad Pregnancy News :  'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
Marathi Serial Update Zee Marathi Bharat Jadhav : भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक,  'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
Embed widget