पालघरमधील संतापजनक घटना; पैसे नसल्याने नाकारली रुग्णवाहिका, चिमुकल्याच्या मृतदेहाची हेळसांड
Palghar Latest News : परंतु आर्थिक चनचनीत अडकलेल्या या कुटूंबाला मृत्युदेह आता घरी न्यायचा कसा? असा प्रश्न उभा ठाकला? यावेळी त्यांनी रुग्णवाहीकेसाठी विचारणा केली
Palghar Latest News : एकीकडे 73वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करतोय. परंतु दुसरीकडे मात्र प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्याला एका मृत्यू पावलेल्या चिमुकल्याला दवाखान्याची रुग्णवाहिका न मिळाल्याने 35ते 40 किमी अंतरावर कडाक्याच्या थंडीत कुडकुडत बाईकवरून मृत्यदेह न्यावा लागल्याची. ही दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथे घडली आहे.
पायरवाडी येथे पहिलीत शिकणारा अजय युवराज पारधी वय 6 वर्ष ह्याला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. यानंतर आई-वडिलांनी उपचारासाठी त्रिंबकेश्वर येथील दवाखान्यात चिमुकल्याला दाखल केलं. परंतु तेथे एक दिवसाच्या उपचारानंतर सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर त्यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णलयात घेऊन गेले. परंतु तेथील डॉ जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल करा, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेचच जव्हार कुटीर रुग्णलयात मुलाला उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान 25 तारखेला रात्री 9:00 वाजता कुटीर रुग्णालयात चिमुकल्याचा मृत्यू झाला.
परंतु आर्थिक चनचनीत अडकलेल्या या कुटूंबाला मृत्युदेह आता घरी न्यायचा कसा? असा प्रश्न उभा ठाकला? यावेळी त्यांनी रुग्णवाहीकेसाठी विचारणा केली असता पैस देणार असाल तरच गाडी मिळेल. अशी तंबीच रुग्ण चालकांनी कुटूंबियांना दिली, असल्याचे मृत्यू अजयचे वडील युवराज पारधी यांनी सांगितले. तसेच पैसे नसतील तर पायीपायी मृत्युदेह घेऊन जा, असेही त्यांना यावेळी सांगण्यात आले. परंतु पैसे द्यायला नसल्याने हताश होऊन थंडीत कुडकुडत 35ते 40 किमी अंतरावर बाईकवर मृतदेह घेऊन गावी पायरवाडीत येथे आले. ही दुर्दवी घटना प्रशासनाच्या कारभार चीड आणणारी असून या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जव्हार कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ रामदास मराड यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई कार्यवाही केली जाईल, असं एबीपी माझाशी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.