एक्स्प्लोर
गोंदियात 'पाकिस्तान झिंदाबाद' लिहिलेल्या फुग्यांची विक्री
लहान मुलांना हाती धरून काही समाजकंटक मुद्दाम असं कृत्य करत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
गोंदिया : गोंदिया शहरात दुर्गा मंडपाजवळ पाकिस्तान आय लव्ह यू , पाकिस्तान झिंदाबाद, असं लिहिलेले आणि पाकिस्तानी लोगो असलेले फुगे विकण्यात येत होते. त्यावेळी युवा सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी हे फुगे पोलिसांच्या स्वाधिन केले.
लहान मुलांना हाती धरून काही समाजकंटक मुद्दाम असं कृत्य करत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. यापुढे फुग्यांची विक्री करत असताना त्यावर काय लिहिलं आहे, हे तपासून पाहावं, अशी ताकीद पोलिसांनी फुगे व्यापाऱ्यांना दिली.
हे फुगे मुंबईच्या बाजारातून खरेदी केले असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. मात्र या नंतर अशा फुग्यांची विक्री करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी नमूद केलं. सोबतच हे फुगे नेमके आले कुठून याचाही पोलीस शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement