मुंबईत जानेवारी 2022 मध्ये 7 हजार 700 पेक्षा जास्त घरांची विक्री; सरकाच्या महसुलात 48 टक्क्यांची वाढ
बांधकाम क्षेत्रावर कोरोनाचा जास्त परिणाम झाला नसल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत जानेवारी 2022 मध्ये 7 हजार 732 बांधकामांची नोंदणी झाली असून त्यातून सरकारला मिळणाऱ्या महसुलात तब्बल 48 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबई : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांचे नुकसान झाले आहे. परंतु, सर्वात जास्त रोजगार देणाऱ्या बांधकाम क्षेत्रावर कोरोनाचा जास्त परिणाम झाला नसल्याचे पाहायला मिळाले. कारण मुंबईत जानेवारी 2022 मध्ये 7 हजार 732 बांधकामांची नोंदणी झाली असून त्यातून सरकारला मिळणाऱ्या महसुलात तब्बल 48 टक्क्यांची वाढ झाली आहे.
बांधकाम श्रेत्रातील नाइट फ्रँक इंडिया या कंपनीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. नाइट फ्रँक इंडियाच्या आकडेवारीनुसार, मुंबई शहरात जानेवारी महिन्यात रोज 249 च्या सरासरीने 7 हजार 732 युनिट्सची नोंदणी झाली आहे. या नोंदणीतून सरकारला 453 कोटींचा महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे जानेवारी 2021 च्या तुलनेत मालमत्तांची नोंदणी 26 टक्क्यांनी कमी झाली आहे. परंतु, महसूल वाढला आहे. मागील वर्षी याच महिन्यात सरकारने 3 टक्क्यांनी मुद्रांक शुल्क कमी केले होते. त्यामुळे घरांची विक्री चांगली झाली होती.
नाइट फ्रँक इंडिया या कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2022 च्या 13 तारखेला 5 हजार 599, 14 ला 5 हजार 497, 15 ला 6 हजार 214, 16 ला 5 हजार 163, 17 ला 3 हजार 619, 18 ला 6 हजार 270, जा 19 ला 4 हजार 605, 20 तारखेला 6 हजार 150, 21 ला 10 हजार 412 मालमत्तांची नोंदणी झाली होती. तर 22 जानेवारी 2022 ला ही आकडेवारी 7 हजार 732 वर पोहोचली आहे.
नाइट फ्रँक इंडिया कंपनीच्या आकडेवारीनुसार, मागच्या म्हणजे 2021 या वर्षात जानेवारी महिन्यात 10 हजार 412 मालमत्तांची नोंदणी झाली होती. मागच्या वर्षी फेब्रुवारी मध्ये 10 हजार 172, मार्च मध्ये 17 हजार 728, एप्रिलमध्ये 10 हजार 136 मे महिन्यात 5 हजार 366, जूनमध्ये 7 हजार 856, जुलैमध्ये 9 हजार 822, ऑगस्ट मध्ये 6 हजार 784, सप्टेंबरमध्ये 7 हजार 804, ऑक्टोंबर महिन्यात 8 हजार 576, नोव्हेंबर मध्ये 7 हजार 582 आणि डिसेंबर 2021 मध्ये 9 हजार 320 मालमत्तांची नोंदणी झाली होती.
मुंबई शहरात विक्री झालेल्या घरांमध्ये शहाच्या पश्चिम उपनगरांमध्ये 52 टक्के घरांची विक्री झाली आहे. जानेवारी 2022 मध्ये नोंदणी झालेल्या घरांमध्ये 52 टक्के घरांची नोंदणी मध्य मुंबई आणि त्या पाठोपाठ पश्चिम उपनगरांमध्ये झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये मुंबई मध्य उपनगरांत 31 टक्के घरांची विक्री झाली होती. हीच आकडेवारी जानेवारी 2022 मध्ये 34 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
याबरोबरच मुंबई शहरात विक्री झालेल्या घरांमध्ये 85 टक्के एक ते दोन हजार स्क्वेअरफुटांच्या घरांचा समावेश आहे. जानेवारी 2022 मध्ये एकूण नोंदणीपैकी 45 टक्के 500 ते 1 हजार स्क्वेअर फुटांच्या घरांची विक्री झाली आहे. तर 500 स्क्वेअरफुटांच्या छोट्या घरांची 40 टक्के विक्री झाली आहे.
नाइट फ्रँक इंडिया कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर व्यवसाय वाढत आहे. ही वाढ थोड्या प्रमाणात असली तरी सकारात्मक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बाजारात अजून चांगली स्थिती पाहायला मिळेल, असे शिसिर बैजल यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या