Budget 2022: GDP म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या प्रत्येकासाठी का महत्त्वाचा आहे जीडीपी
Budget 2022 : देशाच्या अर्थसंकल्पाच्या कालावधीत आणि आर्थिक मुद्यांवर चर्चा करताना GDP चा सारखा उल्लेख होत असतो. GDP म्हणजे काय , त्यावर टाकलेला एक दृष्टीक्षेप...
What is GDP : जीडीपी म्हणजे काय रे भाऊ? हा प्रश्न आताच विचारायचं कारण म्हणजे अर्थसंकल्प आणि दर तीन महिन्यांनी सतत कानावर पडणारी ही अक्षरं जीडीपी. याच जीडीपीनुसार कोणताही देश श्रीमंत असो किंवा गरीब असो, त्याची आर्थिक स्थिती आपल्याला जाणून घ्यायला मदत होते. अशा स्थितीत हे जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते की, जीडीपी म्हणजे काय? आणि त्याची गणना कशी केली जाते
जीडीपीचा इतिहास
जीडीपी हा शब्द पहिल्यांदा अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ सायमन यांनी 1935-44 मध्ये वापरला होता. सायमनने अमेरिकेला ही संज्ञा दिली होती. हा तो काळ होता जेव्हा जगातील बँकिंग संस्था आर्थिक विकासाचा अंदाज बांधण्याचे काम हाताळत होत्या, त्यापैकी बहुतेकांना त्यासाठी शब्द सापडत नव्हता. जेव्हा सायमनने यूएस काँग्रेसमध्ये जीडीपी या शब्दाची व्याख्या या शब्दासह केली तेव्हा IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हा शब्द वापरण्यास सुरुवात केली.
जीडीपी म्हणजे काय ?
ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट (Gross Domestic Product) म्हणजेच एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजेच देशात निर्माण झालेली सर्वच उत्पादनं आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली ठराविक चलनातील आकडेवारी म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन होय.
जीडीपीची आकडेवारी ही देशभरामध्ये दर तीन महिन्याला प्रदर्शित होते. देशांतर्गत झालेल्या उत्पादनांचा आणि सेवेचा जीडीपी चा दर ठरविण्यासाठी विचार केला जातो.
एखाद्या देशाचा जीडीपी हा सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच Gross Demotic Product हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती प्रदर्शित करीत असतो. प्रत्येक देशामध्ये देशाचा जीडीपीचा अंक पाहून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये घसरण झाली किंवा वाढ झाली हे ठरवले जाते. शिवाय कोण कोणत्या क्षेत्रातून देशाला आर्थिक लाभ झाला आहे जीडीपी द्वारे ठरवलं जातं.
जीडीपीचा दर ठरवण्याची पद्धत
जीडीपीचा दर हा मुख्यत: दोन पद्धतीने निश्चित केला जातो. कारण चलन वाढीसह उत्पादनात घट होते. हे प्रमाण कॉन्स्टंट प्राइस म्हणजे कायमस्वरूपी दर आहे आणि यानुसारच जीडीपीचा दर आणि उत्पादनाचा मूल्य एका वर्षाच्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चावरून ठरविले जातं.
वार्षिक जीडीपी (Annual GDP)
वार्षिक जीडीपीमध्ये चालू वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादनाची मागील वर्षातील सकल उत्पादनाशी तुलना केली जाते.
तिमाही जीडीपी (Quarterly GDP)
तिमाही जीडीपीमध्ये मागील वर्षाचे कोणत्याही तीन महिन्यातील सकल देशांतर्गत उत्पादनाची तुलना चालू वर्षातील तीन महिन्यांच्या सकल देशांतर्गत उत्पादनाशी केली जाते.
उदाहरणार्थ: 2021 च्या जानेवारी,फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनाची तुलना 2022 च्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनाशी केली जाते.
या तुलनेने वरून आलेल्या निष्कर्षावरून देशाचा जीडीपीचा दर ठरवला जातो म्हणजेच गेल्या वर्षीच्या सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा यावर्षीच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढलं असेल तर जीडीपीचा दर वाढला असे समजले जाते याउलट गेल्या वर्षीच्या सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा यावर्षीच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये घट झाली असेल तर जीडीपीचा दर घसरला असे म्हणतात.
जीडीपी दराचे सूत्र:
GDP = C + I + G + ( X – M )
जीडीपी = उपभोग + गुंतवणूक + सरकारी खर्च + ( निर्यात – आयात )
C म्हणजे – उपभोग (राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील सर्व खाजगी ग्राहक खर्च).
I म्हणजे – देशाच्या गुंतवणुकीची बेरीज
G म्हणजे – एकूण सरकारी खर्च
X म्हणजे – देशाची एकूण निर्यात
M म्हणजे – देशाचा एकूण आयात वापर उपभोग याने खर्च केलेल्या रकमेचा संदर्भ
GDP चे प्रकार:
> Real Gross Domestic Products (वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादने)
वास्तविक जीडीपीच्या मूल्यांची म्हणजेच Real GDP ची गणना करताना महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकारद्वारे आधार वर्ष निवडले जाते. रिअल ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट्समध्ये, दर वर्षी उत्पादनांच्या किंमती आणि प्रमाणामध्ये होणारा बदल दर्शवून, त्याच आधारभूत वर्षातील उत्पादनांच्या किंमतींचा मागोवा घेऊन अनेक वर्षांसाठी उत्पादनांचे प्रमाण शोधले जाऊ शकते. वास्तविक जीडीपीद्वारे देशाच्या आर्थिक अर्थव्यवस्थेचा अचूक अंदाज लावता येतो.
> Unrealistic Gross Domestic Products (अवास्तव सकल देशांतर्गत उत्पादने)
यामध्ये देशाचा जीडीपी सध्याच्या उत्पादनांच्या मूल्याच्या आधारे मोजला जातो. जीडीपी दर वर्तमान किंमतीद्वारे मोजला जातो.
सामान्यांसाठी जीडीपी का महत्त्वाचा?
सर्वसामान्य जनतेसाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण सरकार आणि नागरिकांसाठी निर्णय घेण्यासाठी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. जीडीपी वाढण्याचा अर्थ देश आर्थिक पातळीवर प्रगती करत आहे. यामध्ये सरकार महत्त्वाची भूमिका पार पाडते कारण सरकारची धोरणे स्थानिक पातळीवर यशस्वी ठरली तरच जीडीपीमध्ये वाढ होणार आहे. जीडीपी कमी होत असेल किंवा वाढत नसेल तर सरकारला आपल्या धोरणांवर काम करण्याची गरज असते.