एक्स्प्लोर

'असं' घरी सांगून 'तो' प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात!

सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन उस्मानाबादच्या एका 20 वर्षीच्या मुलाला काल पकडले. यासंदर्भात झिशानच्या वडिलांशी एबीपी माझाने संवाद साधला. मोबाईलचा चार्जर आणायचा आहे, म्हणून तो घराबाहेर पडला, असल्याचं त्यांनी सांगितलं

उस्मानाबाद : सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन एका 20 वर्षीच्या मुलाला काल पकडले आहे. हा मुलगा प्रेयसीला भेटण्यास पाकिस्तानला निघाला होता. हा मुलगा उस्मानाबादचा आहे. झिशान सिध्दिकी असं या तरुणाचं नाव आहे. यासंदर्भात झिशानच्या वडिलांशी एबीपी माझाने संवाद साधला. ते म्हणाले की, झिशान 11 तारखेला दहा वाजता घरातून बाहेर पडला. मोबाईलचा चार्जर आणायचा आहे, म्हणून तो घराबाहेर पडला. एक तास होऊनही तो घरी आला नाही त्यावेळी त्याला फोन केला. तर त्याचा फोन बंद आला, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, आम्ही वाट पाहिली पण तो घरी आला नाही. तीन महीने झालं लॉकडाऊनमध्ये तो कधीच बाहेर पडला नाही. आम्ही त्याला बाहेर जा म्हटलं तर तो म्हणायचा, बाहेर लॉकडाऊन आहे, बाहेर काय पोलिसांचा मार खायला जाऊ काय. तो नमाज वगेरे घरातूनच करायचा. मात्र त्या दिवशी तो घराच्या बाहेर पडला. दिवसभर तो घरी न आल्यानं आम्ही सात वाजता पोलिस स्थानकात मिसिंगची तक्रार केली आणि लोकांना मेसेजही केले. आम्ही दुसऱ्या दिवशी रविवारी आसपासच्या परिसरात त्याचा शोध घेतला.सोमवारी आम्हाला माहिती मिळाली की, वाशीमधून कॉल आला की तो, शनिवारी रात्री वाशीत होता. तो इथून रिकाम्या हातीच गेला, असंही ते म्हणाले. VIDEO | UNCUT | प्रेयसीला भेटण्यास पाकिस्तानला निघालेल्या तरुणाच्या वडिलांची प्रतिक्रिया भारत-पाक सीमेवरुन उस्मानाबादचा तरुण ताब्यात, प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात आम्हाला बातमी पाहून कळलं की तो बॉर्डरवर सापडला. तो तेरणा कॉलेजला तिसऱ्या वर्षाला इंजिनियरिंगचं शिक्षण घेत आहे. मुलगा असा जाईल असं आम्हाला कधीच वाटत नव्हतं. गल्लीत कुणालाही असं वाटलं नव्हतं. आता हे समोर आल्यावर सगळेजण आश्चर्याने विचारताहेत की, तो असं करुच शकत नाहीत. तो घरात लॅपटॉपवर अभ्यास करायचा, आम्हाला याबाबत माहिती नसल्यानं तो नेमकं काय करतोय? हे कसं कळणार, असंही झिशानच्या वडिलांनी सांगितलं. बीएसएफकडून झिशान सिद्धिकीची चौकशी बीएसएफकडून झिशान सिद्धिकीची चौकशी चालू आहे. अजूनही त्याला उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही. काल रात्री उस्मानाबादचे पथक गुजरातला पोहोचले. VIDEO | UNCUT | प्रेमासाठी काहीही... पाकिस्तानला निघालेल्या तरुणाला कसं केलं ट्रेस? काल सीमा सुरक्षा दलाने झिशानला रात्री पाकिस्तानी सीमेवर 9.30 वाजता पकडले. विशेष म्हणजे तो आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन निघाला होता. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. माहितीनुसार, झिशान हा उस्मानाबादहून अहमदनगरपर्यंत सायकलवर पोहोचला. अहमदनगर ते गुजरात मोटार सायकलवर पोहोचला आणि मग पायी चालत सीमेच्या जवळ पोहोचला. त्याची दुचाकी वाळूमध्ये अडकल्यानंतर तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता. सुरक्षा दलाला वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली. यानंतर त्यांनी झिशानला ताब्यात घेतले. त्यावेळी तो महाराष्ट्रातला असल्याचे स्पष्ट झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील कथित प्रेयसीला भेटण्यासाठी सीमारेषा ओलांडून पाकिस्तानकडे जाण्याची झिशानची इच्छा होती. कथित प्रेयसीला भेटायला बीएसएफने पाकिस्तान आणि कच्छ सीमेपलीकडे फिरत असलेल्या युवकाला पकडले. उस्मानाबाद पोलिसांची एक तुकडी या मुलाला ताब्यात घेण्यासाठी पोहोचली आहे. मुलाच्या दाव्यात किती तथ्य आहे, याचा शोध घेतला जाणार आहे. या मुलाचे वडील मौलाना आहेत. तो इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. जाताना हा उस्मानाबाद ते अहमदनगर जिल्ह्यातील पर्यंत सायकलवर गेला. तिथून त्याने दुचाकी घेतली. याची माहिती कळाल्यावर एटीएस, सायबर, औरंगाबाद, उस्मानाबाद, मुंबई टीम कार्यान्वीत झाल्या. उस्मानाबाद, औरंगाबाद आणि मुंबई एटीएसने शोध घेतला. त्याचा लॅपटाॅप तपासला गेला. तो पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात आहे, हे लक्षात आल्यावर सीमेवर कळवले होते. हे ही वाचा-  प्रेमाच्या शोधात पाकिस्तानात गेलेला मुंबईकर हमीद सहा वर्षांनी मायदेशी हमीद अन्सारी सहा वर्षांनी पाकहून भारतात सुखरुप परत! सैन्य दलातील त्रासाला कंटाळून चंदू चव्हाणांचा राजीनामा, आर्मी म्हणते चव्हाण दोषी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget