एक्स्प्लोर

सैन्य दलातील त्रासाला कंटाळून चंदू चव्हाणांचा राजीनामा, आर्मी म्हणते चव्हाण दोषी

पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर चंदू चव्हाण यांना भारतात परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. या घटनेच्या चौकशीदरम्यान चंदू यांनी भारतीय लष्करी आस्थापनांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन आपण पाकिस्तानविरोधातील संतापातून हे कृत्य केल्याचे सांगितले होते.

धुळे : पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप सुटून आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान चंदू चव्हाण यांनी सैन्य दलातील त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. चंदू चव्हाण यांनी आपला राजीनामा डीएम रेजिमेंट कमान अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. पाकिस्तानातून सुटून आल्यापासून सैन्य दलात माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मला वाईट वागणूक मिळत असल्याचं सांगत या त्रासाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं चंदू चव्हाण यांनी सांगितलं आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे सैन्य दलात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे भारतीय सेनेकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. चव्हाण हे दोषी आहेत, त्यांच्या विरोधात विविध गुन्ह्यांसाठी पाच वेळा शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे आर्मीकडून सांगण्यात आले आहे. नुकतेच युनिट लाईनमध्ये अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी चव्हाण यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली होती. यानंतर चव्हाण आपल्या युनिटमधून फरार होता, असे लष्कराने सांगितले आहे. धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावाचे मूळ रहिवासी असणारे आणि भारतीय सैन्य दलातील 37 राष्ट्रीय रायफल्समधील जवान चंदू चव्हाण भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर चंदू चव्हाण यांना भारतात परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. या घटनेच्या चौकशीदरम्यान चंदू यांनी भारतीय लष्करी आस्थापनांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन आपण पाकिस्तानविरोधातील संतापातून हे कृत्य केल्याचे सांगितले होते. सीमावर्ती भागात तैनात एखाद्या युनिटमध्ये असा काही प्रकार घडला तर केवळ संबंधित व्यक्तीच नव्हे तर तुकडीतील जबाबदार अधिकाऱ्यांवरही वेगवेगळ्या स्वरूपात कारवाई होते. लष्कर संपूर्ण चौकशीअंती कारवाईचे स्वरूप निश्चित करते. या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवत लष्करी न्यायालयाने चंदू यांना 89 दिवसांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगल्यानंतर त्यांची अहमदनगर येथील लष्करी आस्थापनेत बदली करण्यात आली होती. मात्र याठिकाणी आल्यापासून सैन्य दलात मला वाईट वागणूक मिळत असून माझ्याकडे वाईट नजरेने बघितले जात आहे. सातत्याने मिळणाऱ्या वाईट वागणुकीमुळे मी अपमानित होत आहे. यामुळे मी सैन्यात नियमित येऊ शकत नसल्याचं सांगत चंदू चव्हाण यांनी डी एम रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. मी माझ्या समस्या अधिकाऱ्यांना लिखित स्वरुपात दिल्या आहेत. मात्र माझ्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे, माझ्या समस्यांचे निराकारण झाले नाही तर मी आमरण उपोषणाला बसणार आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. चंदू चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे भारतीय सैन्य दलात खळबळ उडाली आहे. चंदू चव्हाण यांच्या राजीनाम्यावर भारतीय सैन्य दलातील अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nandi Sammelan Dombivli : साहित्यनगरी डोंबिवलीत 11 वे नांदी संमेलन उत्साहात; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वागताध्यक्ष
साहित्यनगरी डोंबिवलीत 11 वे नांदी संमेलन उत्साहात; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वागताध्यक्ष
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget