एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
भारत-पाक सीमेवरुन उस्मानाबादचा तरुण ताब्यात, प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात
सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन एका 20 वर्षीच्या मुलाला पकडले आहे. हा मुलगा उस्मानाबादचा असल्याची माहिती आहे. त्याला रात्री पाकिस्तानी सीमेवर 9.30 वाजता पोलिसांनी पकडले.
![भारत-पाक सीमेवरुन उस्मानाबादचा तरुण ताब्यात, प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात Osmanabad youth arrested from Indo-Pak border, claims to have gone to Pakistan to meet his girlfriend भारत-पाक सीमेवरुन उस्मानाबादचा तरुण ताब्यात, प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/17165603/osmanabad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
उस्मानाबाद : सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन एका 20 वर्षीच्या मुलाला पकडले आहे. हा मुलगा उस्मानाबादचा असल्याची माहिती आहे. झिशान सिध्दिकी असं या तरुणाचं नाव आहे. तो सीमेवर आपल्या पाकिस्तानी प्रेयसीला भेटायला गेला होता. त्याला रात्री पाकिस्तानी सीमेवर 9.30 वाजता पोलिसांनी पकडले. विशेष म्हणजे तो आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन निघाला होता. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
माहितीनुसार, झिशान हा उस्मानाबादहून अहमदनगरपर्यंत सायकलवर पोहोचला. अहमदनगर ते गुजरात मोटार सायकलवर पोहोचला आणि मग पायी चालत सीमेच्या जवळ पोहोचला. त्याची दुचाकी वाळूमध्ये अडकल्यानंतर तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता. सुरक्षा दलाला वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली. यानंतर त्यांनी झिशानला ताब्यात घेतले. त्यावेळी तो महाराष्ट्रातला असल्याचे स्पष्ट झाले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील कथित प्रेयसीला भेटण्यासाठी सीमारेषा ओलांडून पाकिस्तानकडे जाण्याची झिशानची इच्छा होती. कथित प्रेयसीला भेटायला बीएसएफने पाकिस्तान आणि कच्छ सीमेपलीकडे फिरत असलेल्या युवकाला पकडले.
उस्मानाबाद पोलिसांची एक तुकडी या मुलाला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली आहे. मुलाच्या दाव्यात किती तथ्य आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.
या मुलाचे वडील मौलाना आहेत. तो इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. जाताना हा उस्मानाबाद ते अहमदनगर जिल्ह्यातील पर्यंत सायकलवर गेला. तिथून त्याने दुचाकी घेतली. याची माहिती कळाल्यावर एटीएस, सायबर, औरंगाबाद, उस्मानाबाद, मुंबई टीम कार्यान्वीत झाल्या. उस्मानाबाद, औरंगाबाद आणि मुंबई एटीएसने शोध घेतला. त्याचा लॅपटाॅप तपासला गेला. तो पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात आहे, हे लक्षात आल्यावर सीमेवर कळवले होते.
हे ही वाचा-
प्रेमाच्या शोधात पाकिस्तानात गेलेला मुंबईकर हमीद सहा वर्षांनी मायदेशी
हमीद अन्सारी सहा वर्षांनी पाकहून भारतात सुखरुप परत!
सैन्य दलातील त्रासाला कंटाळून चंदू चव्हाणांचा राजीनामा, आर्मी म्हणते चव्हाण दोषी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)