एक्स्प्लोर
सामान्य माणसाच्या मृतदेहाची किंमत किती?
सोलापूर/उस्मानाबाद: सामान्य माणसाच्या मृतदेहाची किंमत किती..? सोलापूर जिल्हयातल्या कुर्डूवाडी आणि माढा या दोन पोलिस स्टेशनच्या पोलिस आणि रेल्वे पोलिसांना विचाराल तर ते सांगतील कांहीच नसते....ही घटनाच ते सांगते.
उस्मानाबादचे रुकसेन बडे नातेवाईकांसह पुणे-सोलापूर या पॅसेंजर रेल्वेने दौंडवरून निघाले. पहाटे सव्वाचारच्या सुमारास गाडी कुर्डूवाडी जंक्शनवर पोहोंचली. स्थानकावर चहा विक्रेत्याने रेल्वे डब्यात येवून काहींना चहाही दिला.
सव्वाचारच्या सुमारास रुकसेन बाथरूमकडे गेले. मात्र, झोपेतले आजोबा बाथरूमचा दरवाजा समजून दरवाजाकडे गेले आणि धावत्या रेल्वेतून कोसळले. हा प्रकार एका सहप्रवाशाने पाहिला... आपत्कालीन चेन खेचल्यानंतर गाडी तीन किमी अंतरावर थांबली.
बडेंच्या नातेवाईकांनी अपघाताची माहिती रेल्वे पोलिसांना दिली... पण अपघाताची जागा आपल्या हद्दीत नसल्याची सबब अधिकाऱ्यांनी दिली. नातेवाईकांनी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली...तिथेही अधिकाऱ्यांनी रेल्वेचं पत्र आणण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी पत्र घेतलं... पण पुन्हा हद्दीचा वाद... त्यांनी नातेवाईकांना माढा पोलिसांकडे पिटाळलं.
माढा पोलिसांनी दुपारी सव्वाबाराला पंचनामा केला. पण माढ्यात शवविच्छेदनासाठी डॉक्टर नव्हते. त्यामुळे दुपारी तीन वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात आला. त्यामुळंच प्रश्न इतकाच आहे... की एका सामान्य माणसाच्या मृतदेहाची किंमत किती?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement