एक्स्प्लोर
आजीच्या मायेची उब परदेशी, कळंबच्या गोधडीची अमेरिकेत विक्री
उस्मानाबाद : कधीकाळी गावाकडं घरी जेवणात भाकर आणि अंथरूणात वाकळ हमखास असायची. जुने फाटलेले कपडे.. जुनं धोतर.. लुगड्यावर अंथरून त्याला सुई- धाग्यानं शिवून आजी वाकळ तयार करायची. अलिकडे गावातून वाकळ हद्दपार झाली खरी पण कळंबच्या एका बचत गटानं 100 वाकळी अमेरिकेला विकल्या आहेत.
आजीच्या वाकळी म्हणून 'द बिग इंडियन स्टोरी' नावाच्या ऑनलाईन पोर्टलनं बचतगटाला वाकळी बनवण्याचं काम देऊन या वाकळी अमेरिकत पोहचत्या केल्या. देशांतर्गत विक्रीसाठी आणखी 500 वाकळी तयार होत आहेत.
अंकल सॅमच्या अमेरिकेला कळंबच्या गोधडींची भुरळ पडलीय. गेल्या वर्षीच्या कोल्ड वेवनंतर तीन महिन्यात बचतगटाच्या 100 गोधड्या अमेरिकेला विकल्या गेल्या. अमेरिकेतल्या भारतीयांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी आजीच्या आठवणी म्हणून गोधडीला पसंती दिलीय.
द बिग इंडियन स्टोरीचे मालक रवी नरहिरेंच्या कल्पनेतून गोधड्यांची अमेरिकेत विक्री सुरु झाली. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले रवि मूळचे कळंबचे. पुण्यात राहून ऑनलाईन पोर्टलवरुन वस्तूंची विक्री करतात. आजीच्या गोधडीला अमेरिकेत किती मार्केट मिळेल याचा रवी यांनी सर्वे केला. नंतर गोधडीचं काम बचतगटाला दिलं. परदेशात विक्री व्हावी यासाठी गोधडीला नैसर्गिक रंग वापरला.
एका गोधडीसाठी महिलांना 900 रुपये मिळतात. अमेरिकेत या गोधडीची किंमत आहे 3 हजार रुपये वाकळ, गोधडी अशा विविध नावानं प्रचलित असलेल्या वाकळी पूर्वी उन्हाळ्यात घरोघरी शिवल्या जायच्या.
जुने फाटलेले कपडे, जुनं धोतर, लुगड्यांवर अंथरून त्याला सुई- धाग्यानं शिवली की वाकळ तयार. एक वाकळ विणायला आजीला 8 ते 10 दिवस लागायचे. रवींच्या टीमन वाकळीचे तीन भाग केले. त्यामुळे एक वाकळ तीन दिवसात तयार होते.
कधीकाळी गावाकडं घरी जेवणार भाकरी आणि अंथरुणात गोधडी हमखास असायची. हिवाळ्यात शरीराला उब देणारी उन्हाळ्यात अजिबातही गरम न होणाऱ्या गोधड्या परदेशात लोकप्रिय झाल्या आहेत. अजूनही 500 गोधड्या थोड्या दिवसात अमेरिकेला रवाना होणारायत. तुम्हीही तुमची ऑर्डर पटकन नोंदवा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement