एक्स्प्लोर
अवनी वाघिणीच्या मादी बछड्याला जेरबंद करण्यात यश
नरभक्षक अवनी वाघिणीच्या दोनपैकी एका बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. अवनी वाघिणीच्या C1 असे C2 या दोन बछड्यांपैकी मादी बछड्याला पकडण्यात आलं आहे.
यवतमाळ : नरभक्षक अवनी वाघिणीच्या दोनपैकी एका बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. अवनी वाघिणीच्या C1 असे C2 या दोन बछड्यांपैकी मादी बछड्याला पकडण्यात आलं आहे.
अवनी वाघिणीच्या जेरबंद केलेल्या मादी बछड्याला आज नागपूर गोरेवाडा याठिकाणी पाठवण्यात आलं आहे. त्याला पेंच व्याघ्रप्रकल्पात पाठवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
दरम्यान दुसऱ्या बछड्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासाठी मध्य प्रदेशातून 4 हत्तींनाही पाचारण करण्यात आलं आहे.
अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाची अंजी परिसरात 19 तारखेला सकाळपासून मोहीम सुरु झाली. मध्य प्रदेशातील कान्हा अभयारण्यातील चार हत्तींसह दोन पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पथक दोन्ही बछड्यांचा जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
अंजी परिसरातील जंगलात वनविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांव्यतिकिक्त कोणालाही जाण्यास बंदी करण्यात आली आहे. त्याचसोबत अंजी परिसरातील संपूर्ण 80 एकर परिसर तार कुंपण सह कापडी कुंपणही करण्यात आले आहे. या भागात जाण्यासाठीच्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement