एक्स्प्लोर

मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिल्यामुळे अनेकांची झोप उडाली : एकनाथ खडसे

"मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि अनेकांच्या झोप उडाल्या होत्या, असे स्वतःचे उदाहरण देत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विद्यार्थ्यांना मोठं होण्याचं स्वप्न पाहण्याचा सल्ला दिला आहे.

जळगाव : माणसाने स्वप्न पाहणे आवश्यक आहे, परंतु स्वप्न असे पाहायला हवे की, भल्या भल्यांच्या झोपा उडाल्या पाहिजेत. जसे मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि अनेकांच्या झोप उडाल्या होत्या, असे स्वतःचे उदाहरण देत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विद्यार्थ्यांना मोठं होण्याचं स्वप्न पाहण्याचा सल्ला दिला आहे. जळगावमधील भुसावळ येथे एका शालेय स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात खडसे बोलत होते. भुसावळ येथील नाहाटा विद्यालय येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि गुरुनाथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी खडसे यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्नं पाहण्यास सांगितले. ते सांगताना खडसेंनी स्वतः पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांबाबत सांगितले. खडसे म्हणाले की, "प्रत्येकाने स्वप्न पाहणे आवश्यक आहे, परंतु स्वप्न अशी पाहायची की, भल्या भल्यांच्या झोपा उडाल्या पाहिजेत. जसे मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि अनेकांच्या झोप उडाल्या होत्या." एकाच आठवड्यात दोन वेळा खडसेंच्या मनातली मुख्यमंत्रीपदाबाबदची खदखद बाहेर आली आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील सावदामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित 'एक शाम नाथाभाऊ के नाम' या मुशायराच्या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली होती. खडसे या कार्यक्रमात म्हणाले होते की, "चाळीस वर्षांच्या काळात मला अनेक मंत्रिपदं मिळाली, मात्र मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिले म्हणून कोणताही गुन्हा नसताना आपली ही अवस्था झाली". दरम्यान,आज पुन्हा एकदा खडसेंनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली. VIDEO | 'मुख्यमंत्री की ख्वाहिश कि इसलिये तो ये हालत हुई', एकनाथ खडसेंच्या मनातली खदखद पुन्हा उघड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
Dilip Khedkar : मोठी बातमी : पूजा खेडकरच्या वडिलांचा विधानसभेसाठी शड्डू, भाजपकडे उमेदवारी मागणार, मतदारसंघही ठरला!
मोठी बातमी : पूजा खेडकरच्या वडिलांचा विधानसभेसाठी शड्डू, भाजपकडे उमेदवारी मागणार, मतदारसंघही ठरला!
Harshvardhan Patil : तोपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नये! थेट आमदाराच्या मागणीने इंदापुरात आता नवा वाढण्याची शक्यता
तोपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नये! थेट आमदाराच्या मागणीने इंदापुरात आता नवा वाढण्याची शक्यता
कॅबिनेट मंत्री राज ठाकरेंच्या घरी, गेल्यावर्षी टोलबाबत चर्चा, यावर्षी निर्णय,  मनसेचा अ‍ॅक्शन प्लॅन नेमका काय होता?
कॅबिनेट मंत्री राज ठाकरेंच्या घरी, गेल्यावर्षी टोलबाबत चर्चा, यावर्षी निर्णय,  मनसेचा अ‍ॅक्शन प्लॅन नेमका काय होता?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 14 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaCM Eknath Shinde : लाखो मुंबईकरांना टोलमाफीच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार - एकनाथ शिंदेABP Majha Headlines :  1 PM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सToll Free Entry Mumbai MNS : मुंबईत टोलमुक्त प्रवेश; मनसेकडून मिठाई वाटप; शिवसेनेचाही जल्लोष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
Dilip Khedkar : मोठी बातमी : पूजा खेडकरच्या वडिलांचा विधानसभेसाठी शड्डू, भाजपकडे उमेदवारी मागणार, मतदारसंघही ठरला!
मोठी बातमी : पूजा खेडकरच्या वडिलांचा विधानसभेसाठी शड्डू, भाजपकडे उमेदवारी मागणार, मतदारसंघही ठरला!
Harshvardhan Patil : तोपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नये! थेट आमदाराच्या मागणीने इंदापुरात आता नवा वाढण्याची शक्यता
तोपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नये! थेट आमदाराच्या मागणीने इंदापुरात आता नवा वाढण्याची शक्यता
कॅबिनेट मंत्री राज ठाकरेंच्या घरी, गेल्यावर्षी टोलबाबत चर्चा, यावर्षी निर्णय,  मनसेचा अ‍ॅक्शन प्लॅन नेमका काय होता?
कॅबिनेट मंत्री राज ठाकरेंच्या घरी, गेल्यावर्षी टोलबाबत चर्चा, यावर्षी निर्णय,  मनसेचा अ‍ॅक्शन प्लॅन नेमका काय होता?
केंद्राच्या जुन्या निर्णयामुळे लॉरेन्स बिश्नोईचा ताबा मिळण्यास अडचण, आता मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय!
केंद्राच्या जुन्या निर्णयामुळे लॉरेन्स बिश्नोईचा ताबा मिळण्यास अडचण, आता मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय!
Chandgad Vidhan Sabha : चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा वादाची ठिणगी; राजेश पाटील म्हणाले, 'महायुती अबाधित ठेवायची असेल, तर..'
चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा वादाची ठिणगी; राजेश पाटील म्हणाले, 'महायुती अबाधित ठेवायची असेल, तर..'
Nashik News : येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थकांमध्ये जोरदार राडा, 44 जणांविरोधात गुन्हा दाखल
येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थकांमध्ये जोरदार राडा, 44 जणांविरोधात गुन्हा दाखल
उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली...; महायुती सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली...; महायुती सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget