एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भटक्या कुत्र्याला वाचवताना कार अपघात, एकाचा मृत्यू
सांगली : सांगलीत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच कुत्र्याला वाचवण्याच्या नादात एकाला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. महावितरणचे अधिकारी दीपक जाधव यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती आहे.
अपघातग्रस्त दीपक जाधव स्वतःच्या कारने बाहेर चालले होते. यावेळी रस्त्यावर टोळीनं फिरणाऱ्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी त्यांनी गाडी वळवली आणि कुत्र्याला वाचवताना दीपक जाधव यांची कार वीजेच्या खांबाला धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की त्यातच जाधव यांचा मृत्यू झाला.
एकीकडे सांगलीत भटक्या कुत्र्यांमुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी थेट घरात घुसून लोकांना चावा घेतल्याच्या घटना समोर आल्याने पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांना मारण्याची परवानगी दिली जावी का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement