एक्स्प्लोर
नागपुरात भर रस्त्यावर अल्पवयीन तरुणाची निर्घृण हत्या
नागपूरः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात रस्त्यावर गुंडांनी मागे पळून पळून फिल्मी स्टाईलने अल्पवयीन युवकाची हत्या केली. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैदा झाला आहे. या युवकाची दारु माफीयाच्या मुलीशी मैत्री होती, यातूनच ही हत्या झाली असल्याची माहिती पीडित युवकाच्या बहिणीने दिली.
अत्यंत सभ्य मानल्या जाणाऱ्या मनिषनगर परिसरात हा थरार घडला. नागपुरातील रस्त्यावर 21 ऑगस्टच्या मध्यरात्री एक युवक जीवाच्या आकांताने सैरावैरा धावत होता. दारुच्या नशेत असलेले 6 गुंड त्याचा पाठलाग करत होते. या 6 जणांनी युवकाला मनीषनगर येथील रिलायन्स फ्रेश मॉलजवळ गाठलं आणि त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
पोलिसांचा आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न?
गंभीर जखमी झाल्यानंतर या 17 वर्षीय युवकाने रुग्णालयात दोन दिवस मृत्यूशी अपयशी झुंज दिली. युवकाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत दारु माफिया पवन उर्फ हड्डी महाजन याच्यासह सहा जणांना अटक केली आहे.
दरम्यान, ही हत्या युवकांच्या आपापसातील वादातून झाल्याचं सांगत पोलिसांनी या हत्येमागे पवन हड्डी या दारू माफियाचा हात असल्याचं सत्य हेतू पुरस्पर लपविलं. पोलिसांनी दारू माफिया पवन हड्डीला अटक केली, मात्र हत्येमागे दारूच्या अवैध धंद्याचा संबंध लपविला आहे.
गुंडांना सुपारी देऊन केली हत्या, पीडित कुटुंबाचा आरोप
हत्या झालेल्या अल्पवयीन तरुणाच्या बहिणीने या हत्येमागे सुपारी किलिंगचा आरोप केलाय. दारू माफिया पवन हड्डीला अल्पवयीन तरुणाची त्याच्या मुलीसोबत मैत्री असल्याचा संशय होता. त्यामुळेच पवन हड्डीने पैसे देऊन गुंड आणले आणि अल्पवयीन तरुणाची भर रस्त्यावर हत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.
दारू माफिया पवन हड्डी पोलिसांच्या आशीर्वादानेच गेले कित्येक वर्ष मनिषनगर सारख्या उच्चभ्रू वस्तीत दारूचा अवैध धंदा करून तरुणांना दारूच्या आहारी घालत होता, असा आरोपही आता होतोय. पोलिस न्याय देणार नसतील तर आम्ही न्यायालयाचे दार थोटावू, असा इशारा कुटुंबियांनी दिला आहे.
दरम्यान 'एबीपी माझा'ने मनिषनगरमध्ये सुरु असलेल्या अवैध दारू व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तेव्हा एका सुसभ्य वस्तीत दारूचा अवैध व्यवसाय गेले 16 वर्ष सुरु असल्याचं धक्कादायक तथ्य समोर आलं. परिसरात एका शटरवाल्या दुकानात पवन हड्डी उघडपणे दारू आणून अवैधरित्या विकायचा असं आढळलं.
पाहा व्हिडिओः
संबंधित बातम्याः
आठ महिन्यांच्या मुलासह एनआरआय महिलेची नागपुरात आत्महत्या
नागपुरात बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना
नागपूरमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर सामूहिक बलात्कार, 6 जण ताब्यात
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात चाललंय काय? नागपूर जेलमधून आणखी एक कैदी फरार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement