एक्स्प्लोर

OBC Reservation : मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार कायदा आणणार; असा आहे मध्यप्रदेश पॅटर्न

OBC Reservation : प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे घेण्याबाबतचे विधेयक आज मांडण्यात येणार आहे. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार कायदा आणणार असल्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे. 

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन आज विधिमंडळात विधेयक मांडणार आहे. प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे घेण्याबाबतचे विधेयक आज मांडण्यात येणार आहे. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार कायदा आणणार असल्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे. 

असा आहे मध्यप्रदेश पॅटर्न

मध्यप्रदेशमध्ये ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात ट्रिपल टेस्टची अडचण आली. ट्रिपल टेस्ट शिवाय आरक्षण देता येणार नाही हा निकाल सर्व देशाला लागू झाला. त्यामुळे महाराष्ट्रात ओबीसीशिवाय काही ठिकाणी निवडणूक झाली. मध्यप्रदेश, ओरिसा, कर्नाटकालाही तोच कायदा लागू झाला.  त्यावेळी मध्यप्रदेशने अध्यादेश काढला. निवडणूक आयोगाचे काही अधिकार स्वत:कडे घेतले. प्रभागरचना करणे, कुठे आरक्षण देता येईल ते ठरवणे आदी अधिकार मध्यप्रदेशाने स्वत:कडे घेतले. निवडणूक आयोगाकडे केवळ निवडणूक घेण्याचे अधिकार ठेवले. त्यामुळे त्यांना वेळ मिळाला. प्रभाग ठरवणं आणि पुनर्रचना करणे यात वेळ मिळाल्याने ते आता इम्पिरिकल डेटा गोळा करत आहेत.

मध्यप्रदेश सरकारचा ओबीसी आरक्षणाबाबत मोठा निर्णय

मध्यप्रदेश सरकारनं ओबीसी आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला.  राज्यात सरळसेवा भरतीमध्ये राज्य स्तरावर तसेच जिल्हास्तरावरील पदांमध्ये 73 टक्के आरक्षण करण्यात आलं आहे. यासंबंधीचे आदेश सरकारनं गेल्या महिन्यातच जारी केला आहेत. मध्यप्रदेशमध्ये आता 73 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. सरळसेवा पद भरतींमध्ये याचा लाभ उमेदवारांना होणार आहे. यात अनुसूचित जातींना 16 टक्के, अनुसूचित जमातींना  20 प्रतिशत, ओबीसींना  27 टक्के तर आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या म्हणजे अल्प उत्पन्न गटासाठी 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आलं आहे. या आदेशानुसार ओबीसींचं आरक्षण 8 मार्च 2019 आणि ईडब्ल्यूएससाठीचं आरक्षण 2 जुलै 2019 पासून लागू असल्याचं म्हटलं आहे. या सर्व पदांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण ठेवण्यात आलं आहे. 

मध्यप्रदेश सरकारनं ओबीसी आरक्षण 14 टक्क्यांहून वाढवत 27 टक्के केलं होतं. सरकारनं सर्व विभागांमधील शालेय शिक्षण, आरोग्य आणि संशोधन विभागांमधील भर्ती वगळता अन्य सर्व विभागांमध्ये ओबीसींचं वाढीव आरक्षण 27 टक्के लागू करण्याचं सांगितलं होतं, मात्र या निर्णयाला मध्यप्रदेश हायकोर्टानं स्थगिती दिली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरंCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut : पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी - संजय राऊतAdani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Embed widget