OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार?
OBC Political Reservation Updates :ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे.आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार असून निवडणुकीबाबत न्यायालय आज काय निर्णय देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं याआधी दोनदा स्थगिती दिली आहे. इम्पिरिकल डेटा गोळा करूनच आरक्षण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं याआधीही दिले होते. त्यावरूनच तिढा निर्माण झाला आहे. न्यायालयानं ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यानं ओबीसी आरक्षित जागा वगळून अन्य वॉर्डातील निवडणुका होत आहेत. सरकारनं या निवडणुका एकतर एकत्र घ्याव्यात किंवा पुढे ढकलाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काल न्यायालयात युक्तीवाद झाला आणि आजही होणार आहे. त्यानंतर न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भातली (OBC Reservation) प्रकरणात कालही सुनावणी पूर्ण झालेली नाही. आज (15 डिसेंबर) सकाळी 11 वाजता पुढची सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारनं डेटा उपलब्ध करून द्यावा याबाबत राज्य सरकारचा युक्तिवाद आहे. निवडणुकांबाबतही कालच्या सुनावणीत युक्तिवाद झाला असून उरलेला युक्तिवाद आता आजच्या सुनावणीत होणार आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारसह एकूण तीन हस्तक्षेप याचिकांवरील सुनावणी आज (मंगळवारी) होणार होती. ओबीसी आरक्षणाबाबत अन्य राज्यांचा नियम महाराष्ट्रालाही लागू करा, अन्यथा सर्वच निवडणुका पुढे ढकलून इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी मुदत द्या, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसंच केंद्र सरकारकडे उपलब्ध असलेला डेटा राज्याला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली. निवडणूक आयोगाने राज्यातील 105 नगरपंचायतीमधील ओबीसी प्रभागातील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. येत्या 21 डिसेंबरला यासाठी मतदान होणार आहे. फेब्रुवारीमध्ये 23 महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 299 पंचायत समित्या, 285 नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील 106 नगरपंचायत मध्ये 1802 जागांसाठी निवडणूक होणार होती. आता त्यापैकी ओबीसींच्या 400 जागांच्या निवडणुकीला स्थगिती मिळणार आहे.
मध्यप्रदेश तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांच्या देखील याचिका आहेत. त्या एकत्रित चालवण्यात येत आहेत. इम्पिरीकल डेटा बाबत देखील याचिका दाखल झालेली आहे.याबाबत देखील आज कोर्टात सुनावणी पार पडलीतुषार मेहता यांनी सांगितलं की, जो डेटा राज्य सरकार मागत आहे तो ओबीसीचा डेटा नाही. त्यामुळे देता येत नाही. मात्र राज्य सरकारच्या वकिलाने सांगितलं की, तो वेगवेगळ्या जातींचा आहे. त्यामधील ओबीसी जाती आम्ही शोधून तो घेतो अशी चर्चा पार पडली. याबाबत आता कोर्टाने सांगितलं की, आधी इम्पिरीकल डेटा बाबत जी सुनावणी आहे. ती पाहू. यावेळी ही बाब देखील नमूद करण्यात आली की हा डेटा सदोष आहे. आता हा डेटा द्यायचा की नाही याबाबत सुनावणी आहे. यासोबतच दुसरी जी मागणी होती की निवडणूक पुढे ढकलण्याबाबत ती उद्या सुनावणी पार पडेल, असं भुजबळ म्हणाले. राज्य सरकार ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांशी भुजबळ यांनी दिल्ली दौरा करत चर्चा केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Chhagan Bhujbal On OBC Reseveration : भारत सरकारनं इम्पेरिकल डेटा द्यावा, नाहीतर.... : छगन भुजबळ
- OBC reservation : पवार कुटुंबीय ओबीसींचा कर्दनकाळ, अजित पवारांचा जातीयवाद उफाळतोय, पडळकरांचा थेट हल्ला
- OBC Reservation : ओबीसी आरक्षण हा देशाचा प्रश्न; सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे केली 'ही' मागणी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह