एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचंही आता प्रमोशन
एसटी महामंडळात चालक, वाहक, शिपाई या पदांवर काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं प्रमोशन होणार आहे.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने भेट दिली आहे. एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचंही प्रमोशन होणार असून, प्रमोशन प्रक्रियेत 25 टक्के आरक्षणाची घोषणाही करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली.
एसटी महामंडळात चालक, वाहक, शिपाई या पदांवर काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं प्रमोशन होणार आहे.
एसटी महामंडळात काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केवळ वेतनवाढ दिली जायची. मात्र, लिपिक-टंकलेखक या तृतीय श्रेणीतील किंवा इतर वरिष्ठ पदांच्या बढती प्रक्रियेत कोणतेच स्थान नव्हते. आता मात्र, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वर्ग-3 मधील बढती प्रक्रियेत 25% राखीव जागा ठेवण्यात येतील, अशी घोषणा परिवहन मंत्री दिनाकर रावतेंनी केली.
एसटी महामंडळात सुमारे 1 लाख 4 हजार कर्मचारी काम करतात. त्यापैकी 60 ते 70 हजार कर्मचारी चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई अशा विविध चतुर्थ श्रेणीतील पदांवर कार्यरत आहेत. आतापर्यंत अनेक कर्मचारी एकाच पदावर रुजू होऊन, 30-35 वर्षे सेवा बजावून त्याच पदावर निवृत्त झाले आहेत.
दरवर्षी नित्यनेमाने मिळणारी वेतनवाढ सोडली, तर त्यांना वरिष्ठ पदावरील बढती प्रक्रियेत कोणतेच स्थान मिळत नव्हते. यापुढे या कर्मचाऱ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे शैक्षणिक अर्हता व सेवा ज्येष्ठतेनुसार लिपिक-टंकलेखक पदासह वर्ग-3 मध्ये बढती दिली जाणार आहे. वर्ग-3 पदाच्या एकूण भरती प्रक्रियेमधील 25 टक्के जागा अशा प्रकारे भरण्यात येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
लाईफस्टाईल
निवडणूक
निवडणूक
Advertisement