एक्स्प्लोर

बहुचर्चित नरेगा गैरव्यवहार प्रकरणी पाचशेहून अधिक सरपंच ग्रामसेवकांना नोटिसा

बीड जिल्ह्यात 2010 ते 2020 या दहा वर्षात जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या पाचशेहून अधिक ग्रामसेवकांना त्या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी  नोटिसा बजावल्या आहेत.

बीड : काही दिवसांपूर्वी नरेगामध्ये गैरव्यवहार प्रकरणी तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत बीडच्या जिल्हाधिकार्‍यांची बदली करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. या प्रकरणी आता महसूल विभागाकडून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली असून बीड जिल्ह्यातील जवळपास 500 सरपंच आणि ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

बीड जिल्ह्यात 2010 ते 2020 या दहा वर्षातजिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या पाचशेहून अधिक ग्रामसेवक ग्रामरोजगार सेवकांना त्या त्या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी  नोटिसा बजावल्या आहेत. यात संबंधित ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरप्रकाराचा उल्लेख असून त्यावर तात्काळ खुलासा करण्याचे आदेश देणार आले आहेत.

विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या नरेगाच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यासोबतच ज्या कामाच्या ऑडिटनंतर काम नियमबाह्य झाले असल्याचे पुढे आले होते. त्याच ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवक तसेच रोजगार सेवकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत यानंतर या नोटिशीला तीन दिवसात उत्तर मागितले आहेत.

नरेगाच्या कामामध्ये घोटाळ्याच्या तक्रारी होणे ही काही नवी बाब नाही मात्र या संदर्भामध्ये प्रशासनाकडून वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही म्हणूनच अखेर राजकुमार देशमुख यांनी यासंदर्भात न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. विशेष म्हणजे याच कामात तपासणीत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची बदली करा असा आदेश काढला होता.

बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यात म्हणजे गेवराई, आष्टी, पाटोदा,शिरूर,केज, धारूर, माजलगाव, अंबाजोगाई, परळी आणि वडवणी या अकरा ही तालुक्यातील पंचायत समिती मार्फत या ग्रामपंचायत सरपंच ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामसेवकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याची की पहिलीच वेळ असावी.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला

Embed widget