एक्स्प्लोर
संदीप सावंतांना कुठलीही मारहाण नाही, नारायण राणेंचा दावा
रत्नागिरी : चिपळूणचे काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण केल्याप्रकरणात कुठलंही तथ्य नाही, केवळ पैशासाठी संदीप सावंतांनी निलेशवर गंभीर आरोप केल्याचं काँग्रेस नेते नारायण राणेंनी म्हटलं आहे. ते आज चिपळूणमध्ये बोलत होते.
इतकंच नव्हे तर संदीप सावंतांनी सगळे आरोप फक्त आणि फक्त शिवसेनेच्या इशाऱ्यावर केले आहेत. यामध्ये ठाणे आणि मुंबईतील काही नेतेही सामील असल्याचा नारायण राणेंनी आरोप केला आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी राणेंनी संदीप सावंत हे आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणं आहेत. आणि काही गैरसमज झाले असतील तर आपण ते चर्चेनं दूर करु असं म्हटलं होतं.
...तर निलेश राणेंची नार्को टेस्ट करा: संदीप सावंत
दरम्यान राणेंच्या आरोपानंतर संदीप सावंत यांनी आपण तक्रार मागे घेणार नाही, आणि जर याप्रकरणातलं सत्य बाहेर यायचं असेल तर निलेश राणे आणि आपली नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement