राज्य सरकारकडून सिंगल यूज प्लास्टिकवरील निर्बंधांमध्ये शिथिलता, लाखो लघु उद्योजकांना मोठा दिलासा
Non Woven Bag : राज्य सरकारने प्लास्टिकवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.
Non Woven Bag : राज्य सरकारने प्लास्टिकवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकदाच वापरायचे ताट, वाट्या, चमचे पेल्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. यात विघटन होऊ शकणाऱ्या पदार्थापासून बनवलेल्या आणि एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूवरील ही बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या लाखो लघु उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदी राज्य सरकारने हटवली आहे. त्याचा उद्योजकांना दिलासा मिळणार आहे.
पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि प्रदूषण कमी व्हावे, या दृष्टिकोनातून 2018 आली राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय महाराष्ट्रात घेतला. त्यानंतर केंद्राने सुद्धा प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर या जुलैमध्ये राज्य सरकारने बंदी घातली. मात्र या निर्णयामुळे राज्यातील जवळपास सहा लाख लघु उद्योजकांवर बेरोजगाराची कुऱ्हाड पडणार होती आणि त्यामुळेच यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केली.
प्लास्टिक वापरातील निर्बंध शिथिल करताना कुठल्या प्लास्टिकच्या वस्तूवरील ही बंदी उटवण्यात आली?
विघटन होणाऱ्या पदार्थापासून बनविण्यात येणाऱ्या आणि एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदी उठविण्यात आली आहे.
50 ग्रॅम प्रतिचौरस मीटर (जीएसएम) पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरालाही परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे स्ट्रॉ, ताटे, कप, प्लेट्स, ग्लास, काटे, चमचे, भांडे, वाडगे, कंटेनर आदीच्या वापरास आता मुभा असेल.
५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पॅकेजिंगमुळे उत्पानदनाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार असेल तर त्यापेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या वस्तू विघटन होणाऱ्या असल्याबाबत ‘सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अण्ड टेक्नॉलॉजी’ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करून घेणे उत्पादकांना बंधनकारक असेल.
प्लास्टिकपासून निर्माण होणाऱ्या अविघटनशील कचऱ्याचा सागरी व वन्यजीव तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. प्लास्टिक कचरा नाले, गटारांत अडकून राहिल्याने पूर परिस्थती निर्माण होते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने प्लास्टिक वापराबाबत निर्बंध कडक केले होते. मात्र या निर्बंधांमध्ये शिथीलता मिळाल्यानंतर राज्यातील युवक व महिला बचत गटातील हजारो लाखो महिलांना रोजगार मिळणार आहे. प्लास्टिकवरील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला असला आणि याचा दिलासा लाखो लघु उद्योजकांना मिळणार असला तरी प्लास्टिकचे उत्पादन आणि वापर करताना पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणं ही आता आपली जबाबदारी असणार आहे.