एक्स्प्लोर

मुख्यमंत्री साहेब, लग्नासाठी कुणी मुलगी देईना! जमलं तर एखादी लाडका भाऊ योजना आणा; शेतकरी पुत्रानं वेधलं सर्वांचं लक्ष

Bhandara News: शेतकर्‍यांच्या मुलांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होईना. परिणामी मुख्यमंत्री साहेब जमलं तर एखादी लाडका भाऊ योजना आणा. अशी मागणी भंडाऱ्याच्या एका शेतकरी पुत्राने केली आहे.

Ladki Bahin Yojana भंडारा : शेतकर्‍यांच्या मुलांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होईना. मुख्यमंत्री साहेब जमलं तर एखादी लाडका भाऊ योजना सुद्धा नक्की आणा. अशी मागणी केली आहे भंडाऱ्याच्या एका शेतकरी पुत्राने. शेतकर्‍यांच्या मुलांचे काही कल्याण होईल, अशी एखादी योजना काढावी आणि तरुणांसह शेतकरी पुत्रांनाही दिलासा द्यावा, यासाठी या युवा शेतकरी पठ्ठ्यानं चक्क हातात फलक घेत गावाच्या चौकात उभा राहून सऱ्यांचे लक्ष वेधले आहे.  हातात फलक घेऊन त्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे ही मागणी केली आहे.

मुख्यमंत्री साहेब, लग्नासाठी कुणी मुलगी देईना!

राज्य सरकारनं नुकतीच लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यात महिलांना दीड हजार रुपये महिना मानधन देण्यात येणार आहे. याच धर्तीवर शेतकरी पुत्रांसाठी लाडका भाऊ योजना काढावी, अशी या शेतकरी पुत्राची लक्षवेधी मागणी आहे. जयपाल प्रकाश भांडारकर असं पदवीचं शिक्षण घेणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. जयपाल याच्याकडे सहा एकर स्वतःची शेती असून त्यात तो भात पिकासह बागायती शेती करून उत्पन्न घेतो.

मात्र, शेतकरी आणि त्यांच्या पुत्रांची काय दशा आहे. शेतकरी पुत्रांना विवाहासाठी मुलीही मिळत नसल्याची खंत या युवा शेतकऱ्यांनं बोलून दाखविली आहे. या युवा शेतकऱ्यांनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडं केलेल्या अशा प्रकारच्या अभिनव मागणीची आता गावात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र ही भावना गांव खेड्यातील प्रत्येक तरुण शेतकरी तरूणांनाची असल्याची भावना समाजातून व्यक्त केली जात आहे. 

लाडकी बहीण योजनेत पाच महत्त्वाचे बदल

राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी या नव्या जीआरबद्दल आपल्या एक्स खात्यावरून माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी शासानाचा नवा निर्णयच आपल्या एक्स खात्यावर अपलोड केला आहे. या निर्णयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेल्या बदलांची माहिती देण्यात आली आहे. पण या बदलांपैकी प्रमुख पाच  बदल हे फार महत्त्वाचे आहेत. 

बदलले पाच नियम कोणते आहेत?

1) बदललेला पहिला नियम हा रेशन कार्डसंदर्भात आहे. नवविवाहित महिलेचे नाव लगेच रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे अत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. 

2) परराज्यात जन्म झालेल्या व संबंधित महिला सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल तसेच या महिलने महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर  तर अशा बाबतीत महिलेच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड व 15 वर्षांपूर्वीचे मतदानकार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे.

3) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता पोस्टातील बँक खातेदेखील ग्राह्य धरले जाणार आहे.

4) तसेच योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. 

5) आता सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भआगातील बालवाडी सेविका,  अंगवणवाडी सेविका, आशा सेविका, सेतु सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. म्हणजेच वर नमूद केलेल्या व्यक्ती, आस्थापना महिलांचे अर्ज भरून घेऊ शकतात.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांना आताच दम लागलाय, विदर्भात फक्त 12-13 जागा मिळणार; भाजपच्या सर्व्हेवरून संजय राऊतांची बोचरी टीका
फडणवीसांना आताच दम लागलाय, विदर्भात फक्त 12-13 जागा मिळणार; भाजपच्या सर्व्हेवरून संजय राऊतांची बोचरी टीका
The history of Kasmir : औरंगजेब फक्त एकदाच काश्मीरला गेला तेव्हा काय घडलं? राजा गुलाबसिंहांनी किती लाखात काश्मीर खरेदी केलं?
औरंगजेब फक्त एकदाच काश्मीरला गेला तेव्हा काय घडलं? राजा गुलाबसिंहांनी किती लाखात काश्मीर खरेदी केलं?
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
Mumbai Dabbawala home: मोठी बातमी: मुंबईचे डबेवाले आणि चर्मकारांना सरकारचं मोठ्ठं गिफ्ट, 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार
मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला, मुंबापुरीत 25 लाखात 500 चौरस फुटांचं घरं, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सLalbaugcha Raja Darshan Updates : राजाच्या दरबारी भक्तांची वर्गवारी, गरीब-श्रीमंत असा भेद100 Headlines : 100 हेडलाईन्स : बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 13 Sept 2024Sanjay Raut Full PC : विधानसभेला मविआ 170 ते  175 जागा जिकेल; राऊतांचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीसांना आताच दम लागलाय, विदर्भात फक्त 12-13 जागा मिळणार; भाजपच्या सर्व्हेवरून संजय राऊतांची बोचरी टीका
फडणवीसांना आताच दम लागलाय, विदर्भात फक्त 12-13 जागा मिळणार; भाजपच्या सर्व्हेवरून संजय राऊतांची बोचरी टीका
The history of Kasmir : औरंगजेब फक्त एकदाच काश्मीरला गेला तेव्हा काय घडलं? राजा गुलाबसिंहांनी किती लाखात काश्मीर खरेदी केलं?
औरंगजेब फक्त एकदाच काश्मीरला गेला तेव्हा काय घडलं? राजा गुलाबसिंहांनी किती लाखात काश्मीर खरेदी केलं?
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
Mumbai Dabbawala home: मोठी बातमी: मुंबईचे डबेवाले आणि चर्मकारांना सरकारचं मोठ्ठं गिफ्ट, 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार
मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला, मुंबापुरीत 25 लाखात 500 चौरस फुटांचं घरं, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar Nikki Tamboli :  ''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...'';  जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...''; जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
Investment Plan : चहा सोडा, करोडपती व्हा! नेमकं काय आहे गणित? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
चहा सोडा, करोडपती व्हा! नेमकं काय आहे गणित? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Embed widget