एक्स्प्लोर
'आपलं घर'चा केंद्र आणि राज्य सरकारशी संबंध नाही : प्रकाश मेहता
मुंबई : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या 'आपलं घर' या योजनेचा केंद्र आणि राज्य सरकारशी काही संबंध नसल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे. तसंच 5 लाखांत पुण्याजवळ वन बीएचके घर देण्याचा दावा करणाऱ्या विकासकाला मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे मेहतांनी सांगितलं.
पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे फोटो वापरुन जाहिरात सुरु असलेल्या या योजनेत दोष आढळल्यास दोन दिवसात कारवाई करण्यात येणार आहे.
पुण्यातील '5 लाखात आपले घर' योजनेवर सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
किरीट सोमय्यांचा योजनेवर सवाल मंत्र्यांच्या फोटोसह 'आपलं घर' या योजनेची जोरदार जाहिरात सुरु झाल्यानंतर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. या योजनेद्वारे लाभार्थी इच्छुकांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यासाठी विविध प्रलोभने आणि आश्वासने दिली जात असून, या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.फोटो : काय आहे पुण्यातील '5 लाखात आपलं घर' योजना?
काय आहे 'आपलं घर' योजना? दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या अवतीभवती 5 लाखांमध्ये 'आपलं घर' ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 10 हजार लोकांनी नोंदणी केल्याचं कळतं. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ही योजना राबवण्यात आल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. त्यासाठी प्रत्येक अर्जदाराकडून 1 हजार 150 रुपये अनामत रक्कम परत न देण्याच्या अटीवर भरुन घेण्यात आली आहे. जे अर्जदार पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना 5 लाखात आणि जे ठरणार नाहीत, त्यांना साडे सात लाखामध्ये वन बीएचके फ्लॅट मिळेल अशी जाहिरात करण्यात आली आहे. अर्थात, त्याआधी लॉटरीसुद्धा काढली जाणार आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement