एक्स्प्लोर
परळीत गडकरी-मुंडे एकाच व्यासपीठावर येणार होते, पण...
येत्या 5 जानेवारीला अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याजवळील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभाचा नियोजित कार्यक्रम होता.

परळी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार होते. मात्र, भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. खरंतर नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर येणे, यात नवल असे काही नाही. कारण ते दोघेही अनेकदा अनेक व्यासपीठांवर एकत्र आले आहेत. मात्र परळी मतदारसंघात ते पहिल्यांदाच एकाच कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसणार होते. येत्या 5 जानेवारीला अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याजवळील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभाचा नियोजित कार्यक्रम होता. मात्र, भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. पुढील तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नाही.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























