एक्स्प्लोर

पंतप्रधानांच्या मान्यतेनंतर स्क्रॅपिंग पॉलिसी लागू करणार, 15 वर्षे जुनी वाहनं भंगारात काढली जाणार: नितीन गडकरी 

Vehicle Scrapping Policy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीनंतर देशात स्कॅपिंग पॉलिसी लागू करण्यात येईल आणि 15 वर्षे जुनी सरकारी वाहनं स्क्रॅप केली जातील असं केंद्रिय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. 

नागपूर: सर्व सरकारी वाहनं 15 वर्षानंतर स्कॅप करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेनंतर ही योजना अंमलात आणण्यात येणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. 15 वर्षानंतर वाहनं ही जुनी होतात, त्यातून प्रदूषण वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.  हा निर्णय फक्त केंद्रापुरताच असेल की राज्यांनाही लागू होईल यावर अद्याप स्पष्टता नाही. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 26 जुलै 2019 रोजी मोटार वाहन कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता. त्यामध्ये सरकारी विभागाच्या 15 वर्षाहून जुन्या वाहनांना भंगारात काढावे अशी तरतूद करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता देशात स्क्रॅपिंग पॉलिसी अंमलात येणार आहे. सरकारी विभागाच्या 15 वर्षापेक्षा जुन्या गाड्यांचे 1 एप्रिल 2022 पासून रजिस्ट्रेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेनंतर ही योजना अंमलात येणार असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. 

काय आहे स्क्रॅपिंग पॉलिसी?  

सरकारी विभागाची वाहने म्हणजे सर्व मंत्रालयातील वाहनं, पोलीस, प्रशासनाकडून वापरण्यात येणारी वाहने, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि इतर विभागामध्ये वापरण्यात येणारी वाहनं जी 15 वर्षाहून जुनी आहेत, ती वाहनं आता भंगारात काढण्यात येतील. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील वाहनं म्हणजे महामंडळांकडून वापरण्यात येणारी वाहनं जसे एसटी आणि बेस्टच्या बस, सार्वजनिक उद्योगांमध्ये वापरण्यात येणारी वाहनं हीदेखील भंगारात काढण्यात येतील. 

सरकारच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात वाहनं स्कॅपिंग करण्यात येतील. व्हेइकल स्क्रॅपेज पॉलिसीमुळे भंगारात गेलेल्या जुन्या साहित्याचा पुनर्वापर करता येईल आणि त्यामुळे वाहनांच्या किंमतीत घट होईल. या धोरणांतर्गत केंद्र सरकारने येत्या पाच वर्षाच्या कालावधीत दोन हजार कोटी रुपये खर्च करण्याचं ठरवलं आहे. 

कशी असेल स्क्रॅपिंग पॉलिसी? 
 
स्क्रॅपिंग पॉलिसीमध्ये चार टप्पे असतील. एका टप्प्यात, जर आपण आपले जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी केले तर आपल्याला पाच टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. मात्र या वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असेल. स्क्रॅपिंग पॉलिसी लागू झाल्यानंतर 20 वर्षे जुने खासगी वाहनं आणि 15 वर्ष जुन्या व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे. याकरता ऑटोमेटेड फिटनेस सेंटर पीपीपी मोडमध्ये सुरु केले जातील. 

स्क्रॅपिंग पॉलिसीचा फायदा काय?  

देशात स्क्रॅपिंग पॉलिसी लागू झाल्यानंतर वाहन क्षेत्रात मोठी वाढ होईल. देशातील वाहन क्षेत्राची उलाढाल सध्या सुमारे साडेचार लाख कोटी रुपयांवर आहे. ती स्क्रॅपिंग पॉलिसी लागू झाल्यानंतर सुमारे दहा लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकेल. तसेच देशात लाखो रोजगारांची निर्मिती होईल. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Darekar on Manoj Jarange Patil: 'फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, अठरापगड जातींच्या ताकदीवर मुख्यमंत्री झाले'; प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर पलटवार
'फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, अठरापगड जातींच्या ताकदीवर मुख्यमंत्री झाले'; प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर पलटवार
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
Chandrashekhar Bawankule on Manoj Jarange Patil: बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितले, त्यांची नार्को टेस्ट करा; मनोज जरांगेंच्या आरोपावर महसूल मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितले, त्यांची नार्को टेस्ट करा; मनोज जरांगेंच्या आरोपावर महसूल मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Embed widget