ISIS मध्ये भरती होण्यासाठी तरुणांना फितवणाऱ्या दोघांना आठ वर्षाची सक्तमजुरी; विशेष NIA कोर्टाचा निर्णय
मोहसिन इब्राहिम सय्यद आणि रिझवान अहमद या दोघांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने आठ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मुंबई : इसिस या अतिरेकी संघटनेत सामील होण्यासाठी युवकांना चिथावल्याचा आरोप असलेल्या मालवणी मधील दोन दोषी युवकांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयानं शुक्रवारी आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विशेष एनआयए न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी बुधवारी आरोपी रिझवान अहमद (25) आणि मोहसीन सय्यद (32) यांना या प्रकरणी दोषी घोषित केलं होतं. साल 2018 मध्ये या दोघांवर आरोप निश्चित करण्यात आले होते. या दोघांवरही मालवणी आणि जवळपासच्या तरुणाांना ISIS मध्ये भर्ती होण्यासाठी प्रेरित केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
दोषी मोहसीन सय्यदने यापूर्वीच साडेपाच वर्षांचा आणि रिझवान अहमदने सहा वर्षांचा तुरुंगवास भोगलाय. दोघांनी मागील महिन्यात अचानक गुन्ह्याची कबुली द्यायची असल्याचे कोर्टात सांगितले. त्यानंतर कोर्टाने त्यांना पुन्हा विचार करण्याची संधी दिली होती, त्या नंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. बगदादमध्ये इसिस या अतिरेकी संघटनेमध्ये सामील होण्यासाठी मालाड, मालवणी येथील युवकांना प्रलोभित करण्याचं काम या आरोपींनी केलंय, असा आरोप सररारी पक्षानं कोर्टापुढे केला होता. यामध्ये काही भरकटलेल्या युवकांनीही जबाब नोंदविला आहे.
आम्हाला आमच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे आणि आम्हाला समाजात सामील व्हायचे आहे, असा युक्तिवाद दोघांच्यावतीनं कोर्टात करण्यात आला होता. हे दोघेही प्रत्यक्ष कोणत्याही हिंसाचाराच्या कारवाईमध्ये सामील नव्हते, त्यामुळे त्यांना सुधारण्यासाठी संधी द्यावी अशी विनंती त्यांचे वकिल ए. आर. बुखारी यांनी केली होती. या खटल्यात विशेष सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी 39 साक्षीदारांचा जबाब नोंदविला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
- Malegaon Blast : एटीएसकडून योगी आदित्यनाथांसह संघाच्या नेत्यांना फसवण्यासाठी दबाव, मालेगाव बॉम्बस्फोटातील साक्षीदाराचा गौप्यस्फोट
- Gautam Gambhir : तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू, गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी
- हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हराम दहशतवादी संघटनांशी; सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकावरुन वाद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha